पुण्यातील धक्कादायक घटना, लग्नाचा सल्ला दिला म्हणून वार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 01:12 AM2019-01-09T01:12:50+5:302019-01-09T01:14:52+5:30
खराडी येथील घटना : मित्राच्या आईवरच कुऱ्हाडीने हल्ला
पुणे : लग्न करण्याचा सल्ला दिल्याने एका तरुणाने मित्राच्या आईवर कुºहाडीने वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खराडी येथील यशवंतनगरमध्ये सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास येथे घडली. या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अतुल सावळाशंकर रासकर (वय ३०, रा. खराडी) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत रमा सदाशिव धावनपल्ली (वय ४८) या जखमी झाल्या आहेत. त्यांचे पती सदाशिव धावनपल्ली (वय ५४, रा. खराडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा राकेश व आरोपी अतुल रासकर हे दोघेही मित्र आहेत. फिर्यादीचा मुलगा राकेशचा विवाह ठरल्याने फिर्यादी व त्यांची पत्नी रमा हे दोघेही आरोपी अतुलच्या घरी लग्नपत्रिका देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी आरोपीला विवाह का करत नाहीस? लवकर विवाह कर, असे समजावून सांगितले होते. याचा राग मनात धरून आरोपी अतुल हा सोमवारी फिर्यादी यांच्या घरी आला होता. तेव्हा फिर्यादीची पत्नी रमा या एकट्याच घरी होत्या. आरोपीने त्यांना पाणी मागितल्या, त्या पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेल्या. तेव्हा आरोपीही त्यांच्या पाठोपाठ किचनमध्ये गेला. त्याने अचानक रमा यांच्या डोक्यावर कुºहाडीने हल्ला केली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडा ओरडा केल्यावर आरोपी पळून गेला. रासकरने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले असून तो एमबीए करीत आहे. सध्या तो बेरोजगार असून त्याचे वय ३० वर्षे आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने रमा यांनी त्याला विवाह करण्याचा सल्ला दिला होता.
पोलिसाशी हुज्जत घालणारा अटकेत
पुणे : रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल बंद करण्यास सांगितल्याने पोलीस कर्मचाऱ्यास दमदाटी करणाºया हॉटेल चालकास कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. जाहिद शाफी कुरेशी (वय ३०, रा. कोंढवा खुर्द) असे अटक आरोपीचे नाव आहे. फिर्यादी ए. ए. शेख हे कोंढवा पोलीस स्टेशमध्ये पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी रात्री गस्त घालत असताना त्यांनी आरोपीला त्याचे हॉटेल हे नियमापेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्याने ते बंद करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. के. चाऊस तपास करीत आहेत.
पोलिसाला धमकावले
पुणे : पोलीस कर्मचाºयास धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी पहाटे ताडीवाला रस्ता येथे घडली. फिर्यादी यू. बी. रजपुत (वय ४०) हे बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. ते गस्तीवर असताना त्यांना आरोपी टिप्या ऊर्फ सुलतान लतिफ शेख (वय २५, रा. ताडिवाला रस्ता) हा त्याच्या दोन साथीदारांसह रस्त्यावर उभा असलेला दिसला. त्याला फिर्यादीने तेथून जाण्यास सांगितले. मात्र, त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादी त्यांना ‘चौकीला चला’ असे म्हटल्यावर त्यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जयवंत पाटील करीत आहेत.