माऊलींच्या पालखी सोहळ्याकडे वारकऱ्यांचे लागले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:21+5:302021-05-27T04:11:21+5:30

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील १६ दिवसांच्या प्रवासातील पाच दिवस हे पुरंदर तालुक्यातील भाविकांना सोहळ्याचा व वारकऱ्यांचा सहवास लाभतो. या काळात ...

Warakaris set their eyes on Mauli's Palkhi ceremony | माऊलींच्या पालखी सोहळ्याकडे वारकऱ्यांचे लागले डोळे

माऊलींच्या पालखी सोहळ्याकडे वारकऱ्यांचे लागले डोळे

Next

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील १६ दिवसांच्या प्रवासातील पाच दिवस हे पुरंदर तालुक्यातील भाविकांना सोहळ्याचा व वारकऱ्यांचा सहवास लाभतो. या काळात वारकऱ्यांची यथेच्छ सेवा केली जाते. अन्नदान, वस्तूरुप, औषधे दान केली जातात. तालुक्यातील ज्या गावात वारीचा सोहळा येतो त्या गावातील माहेरवाशीण आवर्जून माऊलींच्या दर्शनासाठी माहेरी येतात. घरोघरी त्या दिवशी पहाटेपासूनच लगबग असते. हे सर्व मागील वर्षी टाळले गेले. या वर्षी तरी वारकऱ्यांची सेवा करायला मिळावी अशी भावना लोक व्यक्त करत आहेत. आता या कोरोनाच्या महामारी संपावी नाही संपली तरी शासनाने योग्य ती दक्षता घेऊन वारी सुरु करावी आणि पुन्हा असा सोहळा बघायला लवकर मिळावा, अशी प्रार्थना वारकरी पांडुरंगाकडे करत आहेत.

--

कोट १

माऊलींची पंढरपूरची वारी ही आमच्या वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असते. वय ८५ वर्षे झाले, सलग ३५ वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरेतील दिंडीत आम्ही चालतो. सोहळा नीरेत आल्यावर नीरा स्नानाला वेळी मोठा आनंद होतो. तो क्षण आम्ही दरवर्षी याची देही याची डोळी पाहायचो. गेल्या वर्षी सोहळा दारबंद एसटी बसमधून गेला. आम्ही माऊलींचे दर्शन होईल या आशेने आस लावून बसलो होतो. पण दर्शन झालेच नाही. या वर्षीही सोहळा व्हावाच, पण झाला नाहीच तर किमान मार्गावरील भाविक भक्तांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन होईल अशा पद्धतीने मार्गक्रम कराव्यात.

- नारायणभाऊ निगडे, वारकरी.

-----

कोट २

सलग ४५ वर्षे अखंडितपणे वारी केली. वयाच्या ७७ व्या वर्षी वारी हुकते याचे दु :ख होतंय. वारी म्हणजे आम्हाला माहेराला जाण्याचा जसा आनंद असतो तसा आनंद असतो. सलग दोन वर्षे वारी नसल्याने या काळात करमत नाही. उन्हाळा संपला की पंढरीच्या वारीचे वेध लागतात, वारीची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू असते. वारीत राज्यभरातील लोक भेटतात, ओळखी वाढतात, लोकांशी त्या भागातील परिस्थिती, शेती, व्यवसायाच्या गप्पा होत असतात. वर्षभरात पायी नाही चाललो तरी वारीचे हे पंधरा दिवस चालण्याने कंटाळा येत नाही.

- किसनराव रणनवरे, वारकरी

----

फोटो क्रमांक : २६ नीरा पालखी पूल

फोटो ओळी : पुणे जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या नीरा शहरातील दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळ्याचा वैभवी लवाजमा याच ब्रिटिशकालीन पुलावरून जातो. त्यानंतर माऊलींचे नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान होते. हे सर्व बहुदा या वर्षीही पाहायाला मिळावे आणि पुलाचे सुनेपण नष्ट व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

===Photopath===

260521\26pun_11_26052021_6.jpg

===Caption===

फोटो क्रमांक : २६ नीरा पालखी पूलफोटो ओळी :  पुणे जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या नीरा शहरातील दुपारच्या विसाव्या नंतर पालखी सोहळ्याचा वैभवी लवाजमा याच ब्रिटिश कालीन पुलावरुन जातो, त्यानंतर माऊलींचे नीरा नदिच्या पवित्र तिर्थात स्नान होते. हे सर्व बहुदा या वर्षीही पहायाल मिळावे आणि पुलाचे सुनेपण नष्ट व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Warakaris set their eyes on Mauli's Palkhi ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.