प्रभाग समित्या पुन्हा भाजपाच्याच ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:56+5:302021-04-10T04:11:56+5:30
पुणे : विविध विषय समित्यांपाठोपाठ पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील १५ प्रभाग समित्यांच्या निवडणुका शुक्रवारी झाल्या. यातील १२ समित्यांवर भाजपाच्या ...
पुणे : विविध विषय समित्यांपाठोपाठ पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील १५ प्रभाग समित्यांच्या निवडणुका शुक्रवारी झाल्या. यातील १२ समित्यांवर भाजपाच्या सदस्यांनी अपेक्षेप्रमाणे निवड झाली. तर, तीन प्रभाग समित्या राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले. १५ पैकी ७ समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली. ऑनलाइन पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
पालिकेमध्ये भाजपाचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे
या निवडणुकीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना नगरसचिव शिवाजी दौंडकर, राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांनी मदत केली. अध्यक्षपदी निवडून आलेल्या सभासदांचा सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
----
या प्रभाग समित्या झाल्या बिनविरोध
औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, येरवडा-कळस-धानोरी, वानवडी-रामटेकडी, कोंढवा-येवलेवाडी
----
निवड झालेले अध्यक्ष पुढीलप्रमाणे.
- औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय : बंडू उर्फ प्रकाश ढोरे - (भाजप)
- शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय : नीलिमा खाडे - (भाजप)
- सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय : ज्योती गोसावी - (भाजप)
- बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय : वर्षा साठे - (भाजप)
- कोंढवा - येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय : वृषाली कामठे - (भाजप)
- कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय : स्मिता वस्ते - (भाजप)
- ढोले पाटील रोड क्षेत्रिय कार्यालय : मंगला मंत्री - (भाजप)
- येरवडा - कळस - धानोरी क्षेत्रिय कार्यालय : अनिल टिंगरे - (भाजप)
- कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय : श्रध्दा प्रभुणे - (भाजप)
- नगररोड - वडगांवशेरी क्षेत्रिय कार्यालय : शीतल शिंदे - (भाजप)
- वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय : वृषाली चौधरी - (भाजप)
- भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय : आरती कोंढरे - (भाजप)
- धनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय : स्मिता कोंढरे - (राष्ट्रवादी काँग्रेस)
- हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय : गणेश ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- वानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय : हमिदा सुंडके (राष्ट्रवादी काँग्रेस)
--