आंबेगावमधील १७ ग्रामपंचायतींची प्रभागरचना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:35+5:302021-02-06T04:18:35+5:30

आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापूर बु., पिंपळगाव तर्फे घोडा, राजपूर, राजेवाडी, पांचाळे बु., माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी ...

Ward composition of 17 gram panchayats in Ambegaon announced | आंबेगावमधील १७ ग्रामपंचायतींची प्रभागरचना जाहीर

आंबेगावमधील १७ ग्रामपंचायतींची प्रभागरचना जाहीर

Next

आंबेगाव गावठाण, थोरांदळे, गंगापूर बु., पिंपळगाव तर्फे घोडा, राजपूर, राजेवाडी, पांचाळे बु., माळीण, शिनोली, आसाणे, कोंढवळ, ढाकाळे, पोखरी, जांभोरी व तिरपाड या आंबेगाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या १५ ग्रामपंचायती आहेत. तर नव्याने स्थापन झालेल्या वडगाव काशिंबेग, वाळुंजवाडी या दोन ग्रामपंचायती आहेत. अशा एकंदरीत १७ ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रमांतर्गत ८ फेेब्रुवारी रोजी तहसीलदारांच्या वतीने प्रत्येक गावाचे गुगल मॅप नकाशे अंतिम केले जाणार आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत तलाठी व ग्रामसेवक स्थळ पाहणी करून प्रभागाच्या सीमा निश्चिती करणार आहेत. तसेच अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण निश्चित करणार. १६ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेस तहसीलदारांच्या वतीने मान्यता दिली जाणार. २२ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभागरचनेत आवश्यकता असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुरूस्त्या करण्यात येणार आहे. २५ फेेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या दुरूस्त्यांना तहसीलदारांच्या वतीने मान्यता दिली जाणार. २६ फेब्रुवारी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना काढली जाणार आहे. तर ४ मार्च विशेष ग्रामसभेत प्रभागनिहाय प्रत्यक्षात आरक्षणे काढली जातील ५ ते १२ मार्च प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहेत. १५ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केल्या जातील आणि २२ मार्चपर्यंत हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने सुनावणी घेतली जाईल. २५ मार्चपर्यंत हरकतींवर अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव अभिप्रायसह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार. ३० मार्च जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रभागरचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार. १ एप्रिल जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या प्रभागरचनेला प्रसिद्धी दिली जाणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Web Title: Ward composition of 17 gram panchayats in Ambegaon announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.