महापालिकेची ‘इलेक्शन पोलिंग’ बुथच्या धर्तीवर प्रभागनिहाय लसीकरण सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:12 AM2020-12-31T04:12:55+5:302020-12-31T04:12:55+5:30

पुणे : कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने, जानेवारी अथवा फेब्रुवारीपासून लसीकरण सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून, पुणे ...

Ward wise vaccination facility on the lines of Municipal Corporation's 'Election Polling' booth | महापालिकेची ‘इलेक्शन पोलिंग’ बुथच्या धर्तीवर प्रभागनिहाय लसीकरण सुविधा

महापालिकेची ‘इलेक्शन पोलिंग’ बुथच्या धर्तीवर प्रभागनिहाय लसीकरण सुविधा

Next

पुणे : कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने, जानेवारी अथवा फेब्रुवारीपासून लसीकरण सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून, पुणे महापालिकेने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्सची पहिली बैठक मंगळवारी पार पडली असून, प्रभागनिहाय‘इलेक्शन पोलिंग’बूथच्या धर्तीवर प्रभागनिहाय लसीकरण सुविधेचे नियोजन केल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव, डॉ. अमित शहा, लसीकरण अधिकारी, आयएमएचे अधिकारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष, बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी, निमसरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्याआरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार आहे. यानंतर दुसºया टप्प्यात महापालिकेचे कर्मचारी, पोलिस, नागरिक संरक्षण दल, गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचाºयांना लस देण्यात येईल. यानंतर पन्नास वर्षे वयावरील जोखीमग्रस्त व्यक्तिंना आणि शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

लसीचे दोन डोस देणार आहे. पहिल्या डोसनंतर अठ्ठावीस दिवसांनी दुसरा डोस देणार आहे. लसीकरणासाठी निवडणुकीप्रमाणे प्रभागनिहाय बूथ रचना करणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. ही यादी कोविड लसीकरणाकरिता तयार केलेल्या कोविन अ‍ॅपवर लोड करण्यात येत आहे. या अ‍ॅपवर नोंद झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस देणार आहे. प्रत्येक बूथवर १ लस टोचणारा, दोन पर्यवेक्षक आणि एक सुरक्षाकासह पाच जणांची टीम असणार आहे. पोर्टलवर नाव व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांना लसीकरणाचा दिनांक, वेळ याचा एसएमएस पाठविणार आहे. लसीकरणानंतर संबधिताला निरीक्षणाकरिता अर्धा तास बूथवरच थांबवून घेतले जाईल. अन्य काही लक्षणे आढळल्यास त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. लस घेणाऱ्या व्यक्तीला ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस दिला आहे, त्याच कंपनीच्या लसीचा दुसरा डोस देणार आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तिला प्रमाणपत्र देणार आहे.

Web Title: Ward wise vaccination facility on the lines of Municipal Corporation's 'Election Polling' booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.