जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:35+5:302021-05-20T04:12:35+5:30

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यात येत असून या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज बांधण्यात येत ...

Ward for young children at the Jumbo Covid Center | जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी वॉर्ड

जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी वॉर्ड

Next

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यात येत असून या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालिकेकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये येत्या आठवड्याभरात लहान मुलांसाठी ''पेडियाट्रिक वॉर्ड'' सुरू केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

लहान मुलांसाठी पालिकेकडून येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात सुविधा निर्माण केली जात आहे. त्यातच आता जम्बो कोविड सेंटरमध्येही वीस बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार केला जाणार आहे. या ठिकाणी वय वर्षे १ ते १४ पर्यंतच्या मुलांवर उपचार केले जाणार आहेत. तूर्तास वीस बेडचे नियोजन करण्यात आले असून हे बेड नंतर वाढविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

लहान मुलांसाठीच्या व्हेंटिलेटर मशीनसाठी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर लागते. हे सॉफ्टवेअर पालिकेकडून खरेदी केले जाणार असून, सद्यस्थितीत वापरात असलेल्या व्हेंटिलेटरला हे सॉफ्टवेअर अपलोड केले जाणार आहे. त्यामुळे हे व्हेंटिलेटर मुलांसाठी वापरता येणार आहेत. जम्बोमध्ये पेडियाट्रिक डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये लहान मुलांच्या कोविड सुविधेबाबत चर्चा करून तयारीबाबत नियोजन करण्यात आले.

-----

जम्बो कोविड सेंटरमध्ये लहान १ ते १४ वयोगटातील मुलांसाठी वॉर्ड सुरू केले जाणार आहे. या ठिकाणी सुरुवातीला वीस बेडची व्यवस्था केली जाणार असून, यामध्ये मुलांच्या व्हेंटिलेटरसाठी सॉफ्टवेअर खरेदी केले जाणार आहे. मंगळवारी पेडियाट्रिक डॉक्टरांची बैठक घेण्यात आली.

- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

------

आयसीयू - ५ बेड

व्हेंटिलेटर - ५ बेड

ऑक्सिजन - १० बेड

Web Title: Ward for young children at the Jumbo Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.