आरोग्यदूतांकडून वारकऱ्यांची सेवा, वारीत जागेवर मिळणार उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:23 AM2018-06-14T02:23:26+5:302018-06-14T02:23:26+5:30

पायी वारीत वारक-यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून, या वर्षीपासून आरोग्य विभागाकडून पहिल्यांदा ‘आरोग्यदूत’ सज्ज होणार आहेत.

wari news | आरोग्यदूतांकडून वारकऱ्यांची सेवा, वारीत जागेवर मिळणार उपचार

आरोग्यदूतांकडून वारकऱ्यांची सेवा, वारीत जागेवर मिळणार उपचार

Next

पुणे - पायी वारीत वारक-यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून, या वर्षीपासून आरोग्य विभागाकडून पहिल्यांदा ‘आरोग्यदूत’ सज्ज होणार आहेत. या आरोग्यदूताच्या माध्यमातून वारक-यांना त्यांच्या जागेवर येऊन प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जवळ आला आहे. सोहळ्यातील वारकरी आणि भाविक यांना आरोग्य, पाणी, स्वच्छता या सेवा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाकडून सर्व नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक विभागाला त्यांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून वारकºयांची आरोग्यसेवा देण्यासाठी औषधांचे किट वाटप करण्यात येते. यात ठिकठिकाणी रुग्णवाहिका उभारण्यात येणार आहे. मात्र, पालखी मुक्काम किंवा विसाव्याच्या ठिकाणी एखाद्या आजारी व्यक्तीला रुग्णवाहिका शोधत त्या ठिकाणी यावे लागते. त्यामुळे वारकरीही उपचार घेण्यास टाळाटाळ करतात आणि आजार अंगावर काढतात. हे टाळण्यासाठी आणि वारकºयांना आहे त्या ठिकाणी वेळेत औषधोपचार मिळावे, प्रत्येक वेळी रुग्णवाहिका शोधावी लागू नये, यासाठी आरोग्य विभागाकडून ‘आरोग्यदूत’ नेमण्यात आले आहे.
दोन्ही पालखीमार्गासाठी एकूण ३० आरोग्यदूत नेमण्यात आले आहे. ते दुचाकीवरून पालखी सोहळ्यात वारकºयांना जागेवर जाऊन आरोग्यसेवा देणार आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडे प्राथमिक उपचाराचे सर्व साहित्य असणार आहे. यांचा ड्रेसकोड असणार आहे.

आरोग्यदूत, ब्लड चेक करणे, ताप, सर्दी, खोकला असल्यास त्यांची तपासणी करून औषध देणे तसेच जखम झाल्यास त्यावर उपचार या सेवा पुरविणार आहेत. त्यांना एक दुचाकी आणि आवश्यक ती औषधे आणि वैद्यकीय उपकरणे देण्यात येणार आहेत. दोन्ही पालखी सोहळ्यांसाठी प्रत्येकी १५ आरोग्यदूत असणार आहेत.
- डॉ. दिलीप माने
आरोग्याधिकारी,
जिल्हा परिषद पुणे

Web Title: wari news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.