एल निनो'बाबत भाकिते वर्तविताना सावधानता बाळगा : जागतिक हवामान संस्थेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 09:34 PM2019-04-04T21:34:39+5:302019-04-04T21:35:18+5:30
एल निनोच्या प्रभावामुळे भारतात मॉन्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीहून कमी पडण्याबाबत जी भाकिते वर्तविली जात आहे़ अशी भाकिते वर्तविताना सावधानता बाळगा, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे़
विवेक भुसे
पुणे : एल निनोच्या प्रभावामुळे भारतात मॉन्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीहून कमी पडण्याबाबत जी भाकिते वर्तविली जात आहे़ अशी भाकिते वर्तविताना सावधानता बाळगा, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे़
एल निनो च्या प्रभावाने प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान लक्षणीय वाढत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात भारतात मॉन्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीहून कमी होण्याची शक्यता अमेरिकन हवामान विभाग, आॅस्टेलियन हवामान संस्था यांनी यापूर्वी व्यक्त केला होता़ बुधवारी स्कायमेटनेही यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे़
एल निनोबाबत वेगवेगळ्या हवामान संस्थांकडून व्यक्त केल्या जाणाºया भाकिताबाबत जागतिक हवामान संस्थेने जाहीर केले आहे की, मॉडेल आणि तज्ञांचे म्हणण्यानुसार सध्या मार्च महिन्यात एल निनो कमकुवत आहे़ जून महिन्यासाठी एल निनो आणखी ५० टक्क्यांपर्यंत कमकुवत होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या काळात दीर्घ काळाच्या दृष्टीने अनिश्चितता आहे़ म्हणून एल निनो च्या प्रभावाबाबत पूर्वानुमान देताना सावधगिरी घेतली पाहिजे, असा इशारा जागतिक हवामान संस्थेने दिला आहे़
याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्या एल निनोची सुरुवात आहे़ मॉन्सूनच्या सुरुवातीपर्यंत ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे़ जसा मॉन्सून प्रगती करेल़ तसा तो कमकुवत होत जाण्याची शक्यता आहे़
भारतीय हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा अंदाज गुरुवारी जाहीर केला़ मॉन्सून मिशन क्लॅमेट फोरकास्टींग सिस्टिम (एमएमसीएफएस) याच्या अंदाजानुसार एल निनोची ही सुरुवात आहे़ ही परिस्थिती मॉन्सूनच्या सुरुवातीपर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे़ त्याचवेळी भारतीय महासागरातील स्थिती स्थिर आहे़ त्यामुळे प्रशांत महासागरातील तापमान जास्त व भारतीय महासागरातील तापमान कमी असे धु्रवीकरण होते़ मॉन्सूनपर्यंत असेच चित्र राहण्याची किंवा त्यात कमीतकमी फरक राहण्याची शक्यता आहे़
भारतीय हवामान विभागामार्फत १५ एप्रिल दरम्यान मॉन्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज व्यक्त केला जातो़ या अंदाजानंतर यंदाचा मॉन्सून नेमका कसा राहू शकेल हे समजणे शक्य होणार आहे़