सक्तीच्या फी वसुलीविरोधात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:54+5:302021-06-01T04:08:54+5:30

धनकवडी : कोरोना महामारीमुळे गेली सव्वा वर्षं शाळा बंद आहेत. मुलांना ऑनालईन शिक्षण सुरू असले, तरी त्यातून १०० टक्के ...

A warning of agitation against forced fee recovery | सक्तीच्या फी वसुलीविरोधात आंदोलनाचा इशारा

सक्तीच्या फी वसुलीविरोधात आंदोलनाचा इशारा

Next

धनकवडी : कोरोना महामारीमुळे गेली सव्वा वर्षं शाळा बंद आहेत. मुलांना ऑनालईन शिक्षण सुरू असले, तरी त्यातून १०० टक्के ज्ञानार्जन होत नाही. दुसरीकडे लाॅकडाऊनमुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक बेरोजगार झाले आहेत, तर कोरोनामुळे बऱ्र्याच विद्यार्थ्यांचे पालक दगावले आहेत. असे असताना शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना फी भरण्याची हरप्रकारे सक्ती करण्यात येत आहे. याविरुद्ध कठोर भूमिका घेत भाजपा युवा मोर्चा खडकवासला मतदार संघातर्फे संबंधित शाळांना फीसक्ती विरोधात निवेदन देण्यात आले.

कोरोना महामारीच्या संकट काळात शाळा बंद असतानाही काही खासगी शाळांनी पालकांकडून जबरदस्तीने फी वसूल करण्याचा तगादा लावला असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, काही शाळांनी विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचा दाखला परस्पर पालकांना घरी पाठवला आहे, काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेमधून काढण्याच्या धमक्या पालकांना दिल्या जात आहेत, तर विद्यार्थ्यांने फी न भरल्याने काही शाळांनी शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ चे निकाल दिले नाहीत, काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग बंद केले आहेत, तर काही शाळांनी चक्क फीवसुलीच्या नोटीस पालकांना पाठवल्या आहेत.

खासगी शाळांच्या जुलमी कारभाराविरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहरचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या सूचनेनुसार आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा - खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सचिन बदक यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला विधानसभा मतदार संघातील विविध शाळांमध्ये जाऊन शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ मधील शैक्षणिक शुल्क वसुलीसंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर, वृषाली चौधरी, खडकवासला मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, माजी नगरसेविका मोहीनी देवकर, स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव गणेश वरपे, सरचिटणीस अभिजित धावडे, उपाध्यक्ष महेश भोसले, किरण हगवणे, दत्तात्रय चौधरी, संजय वर्मा, सुप्रिया भुमकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अनिरुद्ध कोकणे, विशाल उभे, विक्रांत तापकीर, सुशांत कुटे, बापू सरपाटील, निखिल धावडे, किरण मारणे, अशोक कोंडे, रितेश रासकर, गणेश पोकळे, अमोल ठाकर, गणेश देशमुख, प्रतिक जोशी, अभिजित धुमाळ, कृष्णा भंडारी, ओंकार डवरी, संकेत बिरामणे, प्रविण वनशीव उपस्थित होते.

Web Title: A warning of agitation against forced fee recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.