रस्त्याच्या दुरस्थेवरुन आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:29 AM2020-12-04T04:29:05+5:302020-12-04T04:29:05+5:30
दिलेल्या निवेदना असे म्हंटले आहे की, माणिकडोह मार्गे निमगिरी, वैशाखेरे ,नाणेघाट रस्ता एकूण ४३ कि.मी रस्ता दुरुस्ती ...
दिलेल्या निवेदना असे म्हंटले आहे की, माणिकडोह मार्गे निमगिरी, वैशाखेरे ,नाणेघाट रस्ता एकूण ४३ कि.मी रस्ता दुरुस्ती काम तसेच आपटाळे ते कुकडेश्वर रस्त्या अद्यापही पुर्ण झालेला नाही. खड्ड्यामुळे प्रवास करणाºया अनेक प्रवाशांना मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. २०१७ - २०१८ यावर्षी रस्ता दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी ५०% काम पूर्ण करण्यात आले होते. उर्वरित ५०% कामाला अडीच ते तीन वर्ष होऊनही अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. कामाची मुदत ही दोन वर्षांची होती. मात्र काम अद्यापही पूर्ण का झाले नाही. असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. तसेच झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे झाल्याचे म्हंटले आहे़
निवेदन देताना आदिवासी महासंघाचे अध्यक्ष पोपट रावते, रामा भालचिम, काळुराम मुकणे , सोमा साबळे , मोहन बोºहाडे , जालिंदर साबळे , संतोष वायाळ , शरद हिले , सचिन घुटे , देवराम घुटे आदी उपस्थित होते़
फोटो
०२ जुन्नर रस्ता