घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:57+5:302021-07-25T04:10:57+5:30
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, धरणात ५६. ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. डिंभे, गोहे ...
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, धरणात ५६. ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. डिंभे, गोहे खुर्द व आजूबाजूच्या भागातील ओढे, नाले भरून वाहू लागल्याने ते पाणी घोड नदीला मिळाल्याने घोड नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर घोड नदीच्या बाजूला राहणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, नदीवर असणाऱ्या पुलावर गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी राहावे. नदी व ओढ्याकाठी जाऊ नये. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीच्या पुलावर कोणीही गर्दी करू नये, कुठेही दुर्घटना झाल्यास मंचर पोलीस, पोलीस पाटील, ग्रामप्रशासन यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--