पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:58+5:302021-09-13T04:10:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र मुसळधार ...

Warning of heavy rains in Ghat area of Pune district | पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा

पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी ‘अतिवृष्टीचा इशारा’ हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकणातील रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी संंपलेल्या २४ तासांत घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे १७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डुंगरवाडी १३०, शिरगाव दावडी १२०, लोणावळा ८०, खोपोली ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने घाट परिसरातून प्रवासाचा जाताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी.

पुणे शहरात आज दिवसभर आकाश ढगाळ असून अधून-मधून पावसाची एखादी जोरदार सर येत होती. पुणे शहरात ९.१ मि.मी., पाषाण ११.६ आणि लोहगाव येथे ११ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

...

पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी २४ तासांत झालेला पाऊस (मि.मी.) : लवळे १८.५, एनडीए ६, गिरीवन ६२, डुडुळगाव ५, शिवाजीनगर ७, माळीण (आंबेगाव) ५९, तळेगाव ढमढेरे २, पाषाण ११.५, बल्लाळवाडी (जुन्नर) २१, एनईएस लकडी (इंदापूर) ९.५, मगरपट्टा १.५, पाबळ (शिरुर), वडगाव शेरी ३.५, खडकवाडी (आंबेगाव) २, वेताळे (खेड) ८, वाल्हे (पुरंदर) ०.५

Web Title: Warning of heavy rains in Ghat area of Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.