पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 03:33 PM2022-07-03T15:33:49+5:302022-07-03T15:33:59+5:30
भारतात गेल्या काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा हिने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तसेच तिच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्यांचे झाले खून
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या माजी वादग्रस्त प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर देशभरात जी परिस्थितीती निर्माण झाली आहे. त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून इशारा देण्यात आला असून केंद्रीय यंत्रणेनी यावेळी दवे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारतात गेल्या काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा हिने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तसेच तिच्या समर्थनात पोस्ट केल्यानंतर उदयपूर येथे दोन तरुणांनी कन्हैय्या लाल नावाच्या एका टेलरची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर राज्यात अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांची २१ जूनला दुचाकीने आलेल्या आरोपींनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली.आणि आत्ता याबाबत केंद्रीय यंत्रणेने दवे यांना सतर्क राहण्याच सल्ला दिला आहे.
याबाबत दवे हे येत्या सोमवारी डीसिपी विशेष शाखा यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहे. अस असल तरी नियतीने सोपवलेली कार्य हे एक क्षणभर सुद्धा थांबणार नसल्याचं दवे यांनी यावेळी सांगितल आहे.
काय म्हणाले आनंद दवे...