#MeToo कुछ भूत बातों से नही, लाथों से मानते है : तनुश्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 05:04 PM2018-10-26T17:04:02+5:302018-10-26T17:05:36+5:30

#MeToo चळवळ सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता आज ‘लोकमत वुमन समिट’मध्ये या चळवळीमागचा प्रवास उलगडत आहेत.

That was the worst day of my life: Tanushre at lokmat women summit 2018 | #MeToo कुछ भूत बातों से नही, लाथों से मानते है : तनुश्री

#MeToo कुछ भूत बातों से नही, लाथों से मानते है : तनुश्री

Next

पुणेः  देशात #MeToo चळवळ सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता आज ‘लोकमत विमेन समिट २०१८’मध्ये या चळवळीमागचा प्रवास उलगडत आहेत. या चर्चासत्रात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि पुरुष हक्क कार्यकर्त्या बरखा ट्रेहानही सहभागी झाल्यात. या कार्यक्रमाचे लाइव्ह कव्हरेज.... 

>> या गोष्टी विसरता येत नाहीत... मी असं काय केलं की हे सगळं माझ्याबाबतीत झालं, हे सतत मनात येत राहतं.  

>> कोणीही येऊन काहीही बोलू शकतो. दगड मारू शकतो... हे आठवून माझी औकात काय आहे?, असा प्रश्न पडतो.

>> हे माझ्यासोबत होऊ शकतं असा मी विचारही केला नव्हता... 

>> मीही माणूस आहे. त्या गोष्टीने आजही हादरायला होतं. आत्मविश्वास डळमळतो. पण ईश्वर ताकद देतो.

>> हे प्रकरण घडलं, तेव्हा बॉलिवूडमधून पाठिंबा म्हणून अनेक ऑफर येत होत्या. पण मी नाकारल्या. मला यातून बाहेर पडायचं होतं, लांब जायचं होतं. म्हणून सुरू असलेली कामं पूर्ण करून मी दूर झाले. 

>> यावेळी मला लोकांचा पाठिंबा मिळतोय.

>> 2008 मध्ये दिलेल्या तक्रारीत पोलिसांनी लैंगिक अत्याचार टाकलं नाही त्याला मी काय करू? 

>> आपण जर मीटू चळवळीला पाठींबा दिला नाही तर गावागावांतल्या बनवारीदेवींना तुम्ही कसा धीर देणार?

>> काही महिला अशा चळवळीला बाधा आणत आहेत. आतला आवाज ऐकण्यासाठी पण हिंमत लागते. ही चळवळ स्त्री पुरुषांच्या विरोधात नाही.अन्यायाविरोधात आहे.

>> आपल्यापासून सुरुवात केली तर इतर स्तरातील महिलांना पण हिंमत येईल असं मला वाटतं.

>> कुछ भूत बातों से नही, लाथो से मानते है : तनुश्री

Web Title: That was the worst day of my life: Tanushre at lokmat women summit 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.