भोर नगर पालिकेचा कचरा डेपो परिसर हिरवाईने नटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:06 AM2021-01-01T04:06:43+5:302021-01-01T04:06:43+5:30
माझी वसुंधरा योजने आंतर्गत भोर नगर पालिकेला २५०० वृक्षांचे वृक्षा रोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले असून बुधवारी या उपक्रमाचा ...
माझी वसुंधरा योजने आंतर्गत भोर नगर पालिकेला २५०० वृक्षांचे वृक्षा रोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले असून बुधवारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्षा तृप्ती किरवे, माजी उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, गणेश पवार, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, अमित सागळे,नगरसेविका , पद्मिनी तारु, सोनम मोहिते, रुपाली कांबळे, वृषाली घोरपडे, स्नेहल पवार, आशा रोमण, आशा शिंदे यांच्यासह भोर नगर पालिकेचे अधिकारी अभिजीत सोनावले, दिलीप भारंबे, महेंद्र बांदल, लालासो गायकवाड, ज्ञानेश्वर मोहिते, स्वाती होले उपस्थित होते.
यावेळी गुलमोहर, बहावा, कांचन आदी भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षा रोपण करण्यात आले. त्यानंतर हरित भोर करण्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली. भोर नगर पालिकाने माझी वसुंधरा योजने आंतर्गत लावलेल्या वृक्षांचे जतन करण्यासाठी प्रभागाचे नगर सेवक व नगरपालीकेचा एक कर्मचारी यांचेवर जबाबदारी सोपवलेली असल्याचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी सांगीतले.