वारुळवाडीत कचरा विलगीकरण प्रकल्प सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:16+5:302021-05-28T04:08:16+5:30
नारायणगाव : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व पुढे बायोगॅसनिर्मिती प्रकल्प करणारी पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत म्हणून नारायणगाव आणि वारूळवाडी ...
नारायणगाव : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व पुढे बायोगॅसनिर्मिती प्रकल्प करणारी पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत म्हणून नारायणगाव आणि वारूळवाडी या ग्रामपंचायती सयुक्तिकरित्या ठरणार आहेत. दोन्ही ग्रामपंचायतीने ३ कोटी २0 लाखांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ केला असून पहिल्या टप्प्यात कचरा विलगीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे. गेल्या २० वर्षानंतर प्रथमच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणाऱ्या नारायणगाव आणि वारूळवाडी ग्रामपंचायती ठरल्या असल्याने वारूळवाडी गाव दुर्गंधीमुक्त गावाकडे वाटचाल केली आहे.
जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर व ॲड. राजेंद्र कोल्हे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, राजेश बाप्ते, गणेश पाटे, जंगल कोल्हे, जालिंदर कोल्हे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, घनकचरा व्यवस्थापनचे प्रवीण खंडागळे, आनंद पोखरणा, अजित वाजगे, भागेश्वर डेरे, किरण ताजणे, ईश्वर पाटे,आकाश कानसकर यांसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
आशा बुचके म्हणाल्या की, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पातळीवरील व पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रांतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व पुढे बायोगॅस निर्मिती प्रकल्प करणारी एकमेव नारायणगाव आणि वारूळवाडी ग्रामपंचायत असून हा प्रकल्प तीन कोटी २० लाखांचा असून दोन्ही गावाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल.
योगेश पाटे म्हणाले जवळपास २० वर्षांपासूनचा कचरा वारूळवाडी येथील कचरा डेपोत असून या घनकचरा व्यवस्थापनासाठी नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायत मिळून जवळपास २५ लाख रु. प्राथमिक खर्च असून यापुढे बायोगॅस निर्मिती प्रकल्प करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा स्वतंत्र करावा, लवकरच नारायणगाव ग्रामपंचायतीकडून डस्टबिनचे वाटप करण्यात येणार असून ग्रामपंचायतकडून कच-यात जाणारे प्लॅस्टिक व मेटल जमा करून त्याचा मोबदलाही नागरिकांना ग्रामपंचायतकडून दिला जाणार आहे. ग्रामपंचायत सातत्याने गावाच्या विकासाचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने सांगितले.
२७ नारायणगाव १
कचरा विलगीकरण प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी आशा बुचके, संतोष खैरे, योगेश पाटे, राजेंद्र मेेहेर, ॲड. राजेंद्र कोल्हे व इतर.
===Photopath===
270521\27pun_7_27052021_6.jpg
===Caption===
२७ नारायणगाव १ कचरा विलगीकरण प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी आशा बुचके, संतोष खैरे, योगेश पाटे, राजेंद्र मेेहेर, ॲड. राजेद्र कोल्हे व इतर.