जवळच्या कचरा प्रक्रिया केंद्रावरच जाणार कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:37+5:302020-12-26T04:10:37+5:30
पुणे : * घनकचरा विभाग शहरात ज्या प्रमाणात कचरा संकलनाचे काम सुरू आहे, त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा वर्गीकरण ...
पुणे :
* घनकचरा विभाग
शहरात ज्या प्रमाणात कचरा संकलनाचे काम सुरू आहे, त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा वर्गीकरण करून कचरा संकलन करणे़ तसेच प्रचलित पध्दतीनुसार कचरा संकलन झाल्यावर जवळच्या कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविण्याचे नियोजन घनकचरा विभागाकडून केले जाईल़, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली़
शहरात आजमितीला साधारणत: दोन हजार टन कचरा जमा होत आहे़ या २३ गावांमधून दीडशे दोनशे टन कचरा अधिकचा गोळा होईल अशी शक्यता आहे़ मात्र शहराप्रमाणेच या भागातील मोठ्या गृहसंकुलांना तसेच प्रकल्पांना आपला कचरा आपल्याच भागात प्रक्रिया करणे बंधनकारक केले जाणार आहे़ शहरात ज्या प्रमाणे स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात आहे, त्याप्रमाणेच येथेही स्वच्छ किंवा अन्य संस्थेच्या माध्यमातून काम केले जाईल़
घनकचरा विभागात शहरात सुमारे १० हजार कर्मचारी काम करीत असून, या २३ गावांकरिता आता अधिकचा अंदाजे २ हजार कर्मचारी वर्ग लागेल असे अपेक्षित आहे़ याव्दारे व गावे समाविष्ट झाल्यावर मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार येथील सार्वजनिक ठिकाणच्या म्हणजेच रस्त्यांवरील स्वच्छेतेचे नियोजन केले जाईल़
----
बांधकाम विभागाकडून आखणी झाल्यावर, रस्त्यावरील अतिक्रमणे पूर्णपणे काढली जातील़ यात अनाधिकृत विक्रेते, पथविक्रेते यांच्यावर कारवाई करणे हे क्रमप्राप्त आहे़ मात्र गावे समाविष्ट झाल्यावर लागलीच ही कार्यवाही होणार नसून, येथे प्रथम सर्व्हेक्षण करण्यात येईल व सर्व परवानग्यांनंतरही ही प्रक्रिया पूर्ण होईल असेही जगताप यांनी सांगितले़
---------------------