कारवाईची भीती न बाळगता कचरा थेट मुख्य रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:37 AM2019-04-04T00:37:45+5:302019-04-04T00:38:07+5:30

तळवडे : रस्त्यावर कचऱ्याचे ढीग त्याचबरोबर नदीपात्रातही राडारोडा

The waste will not be afraid of action directly on the main road | कारवाईची भीती न बाळगता कचरा थेट मुख्य रस्त्यावर

कारवाईची भीती न बाळगता कचरा थेट मुख्य रस्त्यावर

Next

तळवडे : येथील सॉफ्टवेअर परिसरात रस्त्याच्या कडेला बिनदिक्कतपणे कचरा टाकला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण औद्योगिक वसाहत यांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदी पूल परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने नदीपात्रालगत कचºयाचे ढीग साचले आहेत. दंडात्मक कारवाईला न जुमानता नागरिक कचरा थेट नदीपात्रात टाकू लागले आहेत.

तळवडे येथील सॉफ्टवेअर पार्क परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. उद्योगातील उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ सर्रासपणे नदीपात्रात टाकले जातात. इंद्रायणी नदी परिसरात टाकलेला कचरा थेट नदीपात्रात जात असल्याने पाणी प्रदूषण होत आहे. तळवडे सॉफ्टवेअर पार्क परिसरात बहुराष्ट्रीय आय.टी. कंपन्या आहेत़ यामध्ये काम करण्यासाठी देशातून तसेच परदेशातूनही आय.टी. अभियंते येत असतात. या ठिकाणी उद्योजक यांची तसेच येथील उद्योगांना भेट देणाºया परदेशी पाहुण्यांची ये-जा असते. त्यांना अस्वच्छतेचे दर्शन घडते. .
इंद्रायणी नदीवर उभारलेल्या पुलामुळे दळणवळणाची सोय झाली आहे. परंतु रस्त्यावरून प्रवास करणाºया वाहनांतून या ठिकाणी कित्येक वेळा कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच चाकण औद्योगिक वसाहतीत जाणारे दुचाकीस्वारही कित्येक वेळा पिशवीतून आणलेला कचरा येथे टाकतात, तसेच श्रद्धेपोटी कित्येकजण या पुलावरून निर्माल्य थेट नदीपात्रात टाकत असल्याने पाण्याच्याही प्रदूषणात वाढ होत आहे. कचरा टकाण्यासाठी अनेकजण आवर्जून येतात. कचरा उलण्याची यंत्रणा मात्र या ठिकाणी वेळेत पोहोचत नाही.

मोहीम : एकवीस हजारांची दंड वसुली
तळवडे येथील सॉफ्टवेअर पार्क परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा फलक महापालिकेच्या वतीने लावला आहे. जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांत कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करून २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
- सतीश पाटील, आरोग्य निरीक्षक

Web Title: The waste will not be afraid of action directly on the main road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे