रस्त्यातच भिरकावतात कचरा, नागरिकांचे प्रबोधन करूनही फायदा होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:24 AM2018-08-13T02:24:18+5:302018-08-13T02:24:31+5:30
वारजे येथील कालवा रस्त्यावर जकात नाका ते वर्धमान पेट्रोल पंप या सुमारे सव्वा किमीच्या परिसरात तीन ठिकाणी नागरिकांद्वारे रस्त्यावर कचरा टाकल्याने रस्त्याचीच कचरा कुंडी होत आहे.
वारजे - वारजे येथील कालवा रस्त्यावर जकात नाका ते वर्धमान पेट्रोल पंप या सुमारे सव्वा किमीच्या परिसरात तीन ठिकाणी नागरिकांद्वारे रस्त्यावर कचरा टाकल्याने रस्त्याचीच कचरा कुंडी होत आहे. याबाबत जनजागृती करूनही नागरिकांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याने पावसाने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
पेट्रोल पंपाजवळील मैदानाशेजारी (नादब्रह्म मागची बाजू) फुटपाथवरच सर्रास कचरा टाकल्याचे अनेकदा दिसून येते. या ठिकाणी पालिकेने हा फुटपाथ गेल्याच वर्षी बांधून पूर्ण केला आहे. तरीही या ठिकाणी जवळजवळ दररोजच मोठ्या प्रमाणात कचरा पडत आहे. भले रोज सकाळी पालिकेद्वारे या भागाची स्वच्छता होत आहे. तरीही संध्याकाळपासून जो कचरा पडायला सुरू होतो ते सकाळपर्यंत मोठे ढीग साचतात.
दुसरे या रस्त्यावरील दत्त मंदिराच्या समोरच्या भागात रस्त्याच्या कडेलादेखील कचरा कधी कधी टाकलेला निदर्शनास येत आहे. हे प्रमाण कमी जरी असले तरी त्याने आसपासच्या नागरिकांना त्रास हा होतच आहे. तिसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आंबेडकर चौकातील रजपूत या जुन्या इमारतीच्या मागच्या बाजूस व शेजारील बोळात कायम कचरा पडत असतो. कर्मचाऱ्यांनादेखील या ठिकाणी स्वच्छता करताना मर्यादा पडत आहेत. याच ठिकाणी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला ये-जा करण्याच्या बोळातदेखील कचरा पडत आहे.
कचरा मनोवृत्ती
हा भाग पालिकेत समाविष्ट होऊन अनेक वर्षे लोटूनही अद्यापही लोकांच्या मानसिकतेत फरक पडत नसल्याने व अगदी नाममात्र दरात अगदी घरोघरीदेखील लहान-मोठ्या कचरा व घंटागाड्या जाऊनही काही नागरिकांच्या हेकेखोर वृत्तीने या समस्येचे उच्चाटन होण्यास मर्यादा पडत आहे. एकाने टाकलेला कचरा बघून दुसºयाची पण त्या ठिकाणीच कचरा टाकण्याची मनोवृत्ती बळावत असल्याने समस्येत भरच पडत आहे.
मधुकर कारकुड, विभागीय आरोग्य निरीक्षक, वारजे कर्वेनगर - चर्च परिसरातील निवडक काही घरे अद्यापही घंटागाडीशी जोडण्याचे काम बाकी राहिले आहे. काम अंतिम टप्प्यात असून लवकरच
पूर्ण होईल.
काही वेळा दंडात्मक कारवाई करताना कर्मचाºयांवर दबाव टाकला जातो. त्यामुळेदेखील परिसरात कचरा वाढण्यास मदत होते. याबाबतीत आंबेडकर चौक व आसपासच्या भागात नागरिकांबरोबरच काही व्यावसायिकदेखील कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच गुन्हे दाखल करण्याचे कामदेखील प्रस्तावित आहे.