घड्याळातही कलाकुसर म्हणून लाखोंच्या घरात किमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:32+5:302021-07-27T04:10:32+5:30
फक्त वेळ पाहायची तर अगदी पन्नास रुपयांचेही घड्याळ असते. पण घड्याळातही शौकिन असतात. ते घड्याळातील कलाकुसर पाहत असतात. लक्झरी ...
फक्त वेळ पाहायची तर अगदी पन्नास रुपयांचेही घड्याळ असते. पण घड्याळातही शौकिन असतात. ते घड्याळातील कलाकुसर पाहत असतात. लक्झरी घड्याळांचे कलेक्शन करतात. ही लक्झरी घड्याळे इतकी महाग का असतात? तर त्यांची घडवणूकच उत्कृष्ट मटेरिअलने केली असते. त्यासाठी अनेक ब्रँड खूप मेहनत घेतात. काही ब्रँडनी तर आपल्या घड्याळाचे वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी स्वत:चे सोने बनविणे सुरू केले आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्षे त्यासाठी संशोधन आणि विकास (आर ॲड डी) केले जाते. त्यामुळे साहजिकच ही घड्याळे बनविण्याची प्रक्रिया खूपच खार्चिक आणि वेळखाऊ असते.
लक्झरी घड्याळांचा एक वर्ग आहे. पण सध्या लोक स्मार्ट वॉचकडेही वळत आहेत. उपयोगितेचा विचार केला तर स्मार्ट वॉच अन्य घड्याळांपेक्षा कितीतरी पुढे असते. मात्र, कलाकुसर किंवा स्टाईल म्हणून स्मार्ट वॉच लक्झरी वॉचशी स्पर्धा करू शकत नाहीत. तरीही टेकसॅव्ही पिढीचा कल स्मार्ट वॉचलाच असतो. याचे कारण म्हणजे स्मार्ट वॉचमध्ये विविध फिचर्स असतात. त्यामुळे अगदी प्रौढांनाही स्मार्ट वॉच भुरळ घालतात. सध्या आरोग्याबाबत जागृती वाढली आहे. स्मार्ट वॉचमध्ये आरोग्यासाठी अनेक फिचर्स असतात. तंत्रज्ञान प्रगत होत असताना स्मार्ट वॉचही आणखी आधुनिक होत आहेत.
- सी. टी. पंडोले