यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा आॅनलाईनच पाहावा ; पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 07:42 PM2020-08-31T19:42:02+5:302020-08-31T19:44:48+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना घाटांवर जाण्यास बंदी,घरीच विसर्जन करावे...

Watch the immersion ceremony of Main Ganapati in Pune by online; Police appeal | यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा आॅनलाईनच पाहावा ; पोलिसांचे आवाहन

यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा आॅनलाईनच पाहावा ; पोलिसांचे आवाहन

Next
ठळक मुद्देआवश्यकतेनुसार रस्ते बंद करण्यात येणार


भाविकांना घाटांवर जाण्यास बंदी  आवश्यकतेनुसार रस्ते बंद करणार
पुणे : गेले १० दिवस गणेशोत्सव ज्या साधेपणाने साजरा केला. त्याचप्रमाणे गणेश विसर्जन जागेवरच करावे. मानाच्या गणपतीचे विसर्जनही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित करायचे आहे. विसर्जन सोहळा भाविकांनी आॅनलाईनच पाहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. आवश्यकता भासल्यास मानाचा गणपतीचे विसर्जनाच्या वेळेला तेथील रस्ते बंद करण्यात येणार असून तेथील वाहतूक अन्य रस्त्यावर वळविण्यात येणार आहे.
शहरात जवळपास ४ लाख ७३ लाख घरगुती गणपती बसविले जातात. दीड दिवस, पाचवा, सहावा आणि सातव्या दिवशी गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी कोणीही घाटावर आले नाही. सर्वांनी घरात अथवा घराजवळ उपलब्ध करण्यात आलेल्या हौदात विसर्जन केले आहे. 
याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, या गणेशोत्सवातपोलिसांनी तयार केलेल्या आचारसंहितेचे १०० टक्के पालन करुन पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काही जण घाटावर आले होते. त्यांना परत पाठविण्यात आले होते. हा अपवाद वगळता त्यानंतर कोणीही नदीकाठी विसर्जनासाठी आले नाही.७५ टक्के सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मंदिरातच उत्सव साजरा केला. काही मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत होते. त्यांना पोलिसांनी माघारी पाठविले. मानाच्या गणपतींनी त्यांचे गणेश मूर्तीचे विसर्जनाच्या वेळा जाहीर केल्या असून त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे़ त्यामुळे भाविकांनी घरी बसूनच हा सोहळा पहावा. 
७ हजार पोलिसांचा बंदोबस्त
दरवर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांना रात्रभर बंदोबस्त करावा लागतो. यंदा तो करावा लागणार नसला तरी पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त राहणार आहे.मानाच्या गणपतीच्या ठिकाणी नागरिकांनी येऊ नये, तसेच शहरात नागरिकांनी गर्दी करु नये, यासाठी सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकासह ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी मंगळवारी रस्त्यावर असणार आहेत.
मानाच्या गणपतीच्या विसर्जनप्रसंगी तेथे नागरिकांनी गर्दी करु नये, यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास शिवाजी रोडवरील वाहतूक बंद करुन ती अन्य रस्त्याने वळविण्यात येणार आहे.

Web Title: Watch the immersion ceremony of Main Ganapati in Pune by online; Police appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.