वन विभाग ठेवणार ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वन्यप्राण्यांवर वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 02:10 AM2018-10-31T02:10:20+5:302018-10-31T02:10:59+5:30
हालचाली येणार टिपता; इको-टुरिझमला मिळणार चालना, वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठीही ठरणार फायदेशीर
पुणे : वनांचा मोठा परिसर आणि त्यात वावरणाºया प्राण्यांचे संरक्षण करताना वनकर्मचाºयांना अनेक समस्यांना यापूर्वी तोंड द्यावे लागत होते. मात्र, या पुढे हा त्रास कमी होणार असून, वन्यप्राणांच्या हालचाली अचुक टिपता याव्या, या बरोबरच जंगलांचे संरक्षण करण्यासाठी वन विभागातर्फे आता ड्रोन कॅमेरा आणि पीटीझेड कॅमेºयांचा वापर करण्यात येणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या वनांची तसेच प्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारी वन कर्मचाºयांवर आहे. मात्र, अपुºया संख्येमुळे एवढ्या मोठ्या परिसरावर लक्ष ठेवणे या शक्य होत नव्हते. वनकर्मचाºयांची ही अडचण लक्षात घेऊन वन विभागाने आता यासाठी आता हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. पुणे वन विभागातील वनांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून ड्रोन आणि पीटीझेड कॅमेरा वापरण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत पुणे वन विभागातील मुख्य वन्यजीव वनसंरक्षक आर. के. वानखेडे म्हणाले, पुणे वन विभागाचा मोठा परिसर पाहता यावर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागातर्फे वनांच्या सुरक्षेसाठी ड्रोन आणि पीटीझेड कॅमेºयांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे. सुरुवातीला पुणे विभागासाठी पाच ड्रोन आणि पाच पीटीझेड कॅमेरे मंजूर करण्यात आले आहेत. दीड महिन्यात हे कॅमेरे खरेदी करण्यात येणार आहेत. हे कॅमेरे चालविण्यासाठी वनकर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ड्रोन कॅमेºयामुळे वन कर्मचाºयांना एका जागेवर राहून मोठ्या वन क्षेत्रावर लक्ष ठेवता येणार आहे. यामुळे वनक्षेत्राच्या सुरक्षेबरोबरच वन्य प्राण्यांच्या विविध हालचालींवरदेखील विभागाला नजर ठेवता येणार आहे. शेकडो एकरांत पसरलेला जंगलावर आणि या प्रदेशातील वन्यजीवांवर देखरेख ठेवणे या कॅमेºयामुळे सोयीचे होणार आहे.
इको टुरिझमसाठी ठरणार वरदान
वन्यप्राणी पाहण्यासाठी अनेकदा पर्यटक वन क्षेत्रात येतात. मात्र, अनेकदा त्यांना या प्राण्यांचे दर्शन होत नाही.
काही वेळा वन्यप्राणी दिसलेच तर ते मनुष्याच्या वावरामुळे आणखी दूर वनात निघून जातात. यामुळे अनेकदा पर्यटकांची निराशा होऊन त्यांना वन्यप्राणी न बघताच माघारी फिरावे लागते.
ड्रोन कॅमेºयामुळे दाट वनक्षेत्रात असलेल्या प्राण्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. जंगलातील वन विभागाच्या केंद्रातून टीव्हीवर या ड्रोन आणि पीटीझेड कॅमेºयांमुळे वन्यप्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. तसेच प्राण्यांच्या सुरक्षेवरही त्याचा चांगला परिणाम होईल, असे वानखेडे म्हणाले.
प्राण्यांच्या दैनंदिनीचा करता येणार अभ्यास
बदलत्या वातावरणामुळे प्राण्यांच्याही सवई बदलत चालल्या आहेत. या प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी दरवेळी जंगलात जाणे शक्य होत नाही.
वनक्षेत्रात या प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी गेले असता मानवी अस्तित्वामुळे प्राणी दूरवर निघून जातात. यामुळे त्यांच्या सवयी टिपण्यास अनेक अडचणी येतात. मात्र, ड्रोन कॅमेºयांमुळे या प्राण्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवता येणार आहे.
पुणे विभागात या ठिकाणी ठेवणार ड्रोन कॅमेरे नजर
सुपे अभयारण्य १
रेहकुरी अभयारण्य १
माळढोक सर्वेक्षण २
भीमाशंकर अभयारण्य १