रंगरेषांचा गुणी चित्रकार बनला वॉचमन!

By admin | Published: June 15, 2017 04:55 AM2017-06-15T04:55:00+5:302017-06-15T04:55:00+5:30

रंगरेषांच्या सुरेख मिलाफातून कलाकृती रेखाटण्याचे वरदान लाभले खरे; परंतु परिस्थितीने गांजलेल्या वयोवृद्ध चित्रकाराला पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी

Watchman became a dainty painter! | रंगरेषांचा गुणी चित्रकार बनला वॉचमन!

रंगरेषांचा गुणी चित्रकार बनला वॉचमन!

Next

- प्रीती जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रंगरेषांच्या सुरेख मिलाफातून कलाकृती रेखाटण्याचे वरदान लाभले खरे; परंतु परिस्थितीने गांजलेल्या वयोवृद्ध चित्रकाराला पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी दिवसभर चित्र रंगवून रात्री इमारतीखाली वॉचमन म्हणून काम करावे लागत आहे. विनोद मंगेशकर या गुणी चित्रकाराच्या आयुष्याची ही संघर्षगाथा!
मंगेशकर यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड; पण चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण झालेले नसतानाही चित्रकलेचे गुण त्यांच्यात उपजत होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा वैजयंतीमालेचे चित्र रेखाटले होते. पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चित्र काढून त्यावर खुद्द त्यांची स्वाक्षरीही घेतली होती. नेहरू यांच्या कौतुकाची थापही मंगेशकरांच्या पाठीवर पडली. त्यानंतरही त्यांनी चित्रकलेचा घेतला वसा न टाकता विविध मान्यवरांसह नैसर्गिक, सांस्कृतिक आदींची पेंटिंग करून चित्रे तयार केली. तरुणपणी त्यांच्या चित्रांचे अनेकांनी कौतुक केले. अनेकांची त्यांची चित्रे नावाजलीदेखील. खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या अनेकविध चित्रांना रसिकांची मनसोक्त दादही मिळाली; परंतु वयासोबत अनेक समस्यांनी घेरले. त्यांच्या हृदयाचे आॅपरेशन झाले. सद्य:स्थितीत ते खूप आजारी असतात तरीही रात्रीच्या वेळी वॉचमन म्हणून काम करतात. त्यांची पत्नी धुण्याभांड्याची कामे करून घराला हातभार लावते. त्याच येणाऱ्या तुटपुंज्या पैशातून घराचा खर्च कसाबसा चालवला जातो. आजही ते आपल्या जुन्या चित्रांच्या आठवणीमध्ये रमून जातात. जमतील तशी चित्रे रंगवतात.

सचिनला माझे चित्र द्या...
मंगेशकर यांनी अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबरच प्राणी, पक्षी यांची चित्रे रेखाटली आहेत. असेच एक चित्र त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे तयार केले आहे.
हे चित्र माझे वय झालेले असल्यामुळे देता येणार नाही; त्यामुळे मी काढलेले हे चित्र सचिनला कोणी तरी नेऊन द्या... अशी हाक ते
येणाऱ्या-जाणाऱ्यांना देत आहेत.

मदतीसाठी सरसावले...
राहुल खिसमतराव आणि भारत जनाज या तरुणांना कलाकाराची ही स्थिती लक्षात आल्यानंतर ते त्याला त्यांच्या परीने मदत करीत आहेत. मंगेशकर यांनी काढलेल्या चित्रांचे आॅनलाईन प्रदर्शन भरवून त्यातून विकल्या जाणाऱ्या चित्रांतून त्यांना आर्थिक मदत करावी, असा त्यांचा विचार आहे.

Web Title: Watchman became a dainty painter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.