वॉचमनच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:56+5:302020-12-07T04:07:56+5:30

नारायणगाव : वारूळवाडी ( नारायणगाव ) येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न आज ...

Watchman's vigilance foiled the theft attempt | वॉचमनच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला

वॉचमनच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला

Next

नारायणगाव : वारूळवाडी ( नारायणगाव ) येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न आज मध्यरात्री ३ वा. सुमारास नारायणगाव पोलीस व एका जागृत वॉचमनच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला . पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने एटीएम मशीनमध्ये ७ लाख ६० हजारांची रक्कम सुरक्षित राहिली . विशेष म्हणजे ही बँक पुणे– नाशिक महामार्गावर व पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे .

वारूळवाडी येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएम समोर मध्यरात्री ३ वा सुमारास काही व्यक्ती संशयितपणे फिरत असल्याचे व काहीतरी आवाज सुरु असल्याचे बँकेच्या लगत असलेल्या पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स शोरूमचा वॉचमन महंमद कुजूम यांच्या लक्षात आले . त्यांनी तात्काळ नारायणगाव पोलिसांना हि माहिती कळविली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक डि. के. गुंड व पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी येताच अज्ञात चोरटे अंधाराचा फायद घेत कटर व गॅस टाकी तेथेच सोडून पळून गेले . चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने मशीन फोडत असताना सीसीटीव्ही चा कॅमेरा व लाईटचे सर्किट तोडले होते . या घटनेच्या वेळी एटीएम मशीन मध्ये ७ लाख ६० हजारांची रक्कम होती . या घटनेची फिर्याद बँक सर्व्हिसेस मॅनेजर निशांत रंगारी यांनी दिली आहे .पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

फोटो

०६ नारायणगाव

वारूळवाडी येथे आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा अज्ञातांचा प्रयत्न अपयशी ठरला.

Web Title: Watchman's vigilance foiled the theft attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.