पाणी व पार्किंगचा आज निर्णय, स्थायी समितीची बैठक : धोरणाकडे पुणेकरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:36 AM2018-02-12T05:36:33+5:302018-02-12T05:36:57+5:30

महापालिका आयुक्त यांची महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजना व शहरातील सार्वजनिक पार्किंग धोरणाबाबत सोमवारी (दि. १२) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे हे प्रकल्प असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 Water and parking today's decision, Standing Committee meeting: Pune's attention to policy | पाणी व पार्किंगचा आज निर्णय, स्थायी समितीची बैठक : धोरणाकडे पुणेकरांचे लक्ष

पाणी व पार्किंगचा आज निर्णय, स्थायी समितीची बैठक : धोरणाकडे पुणेकरांचे लक्ष

Next

पुणे : महापालिका आयुक्त यांची महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजना व शहरातील सार्वजनिक पार्किंग धोरणाबाबत सोमवारी (दि. १२) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे हे प्रकल्प असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेकडून राबवण्यात येणाºया चोवीस तास पाणीपुरवठा योजना कायमच वादात राहिली आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनसुद्धा विशिष्ट कंपनीला प्रशासन अधिक महत्त्व देत असल्याचे समोर आले आहे. सहा निविदा एलअ‍ॅण्डटी कंपनीला देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे तीनपेक्षा अधिक निविदा एका कंपनीला देऊ नयेत अशी अट असतानासुद्धा.
अशा प्रकारे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. चोवीस तास पाणी योजनेमध्ये पाइपलाइन टाकणे, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेन्टेनन्स असे सहा भाग करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सुमारे २३१५ कोटींचा हा प्रकल्प असून २०५० कोटींच्या निविदा प्रशासनाला मिळाल्या आहेत. सरासरी १० ते १२ टक्के कमी दराने कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. सहा ही भागात एलअ‍ॅण्डटी कंपनीने कमी दराच्या निविदा आल्या आहेत.
सार्वजनिक वाहतूकीचा वापर व्हावा-
शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक पार्किंग पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे. शहरातील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, अशी धोरणे लक्षात ठेवून पार्किंग धोरण तयार करण्यात आले आहे.
शहरामध्ये रात्रंदिवस पे अँड पार्क करण्याचा विचार पालिका प्रशासनाचा असून, हे धोरण स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. यावर सोमवारी होणाºया बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title:  Water and parking today's decision, Standing Committee meeting: Pune's attention to policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.