सिंहगड राेडच्या प्रवाशांना अाता बसमध्येही मिळणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:48 PM2018-04-23T19:48:58+5:302018-04-23T19:48:58+5:30
प्रवाशांना तसेच बसच्या चालक-वाहकांना या वाढत्या तापमानात बसमध्ये पाण्याची साेय असावी या उद्देशाने पुण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिेंहगड राेडवरील 20 बसेसमध्ये माेबाईल पाणपाेई लावली अाहे.
पुणे : उन्हाचा तडाका दिवसेंदिवस वाढताेय. त्यात नेहमी पाणी जवळ बाळगणे कठीण जाते. या पार्श्वभूमीवर सिंहगड राेड येथील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड रस्त्यावर धावणाऱ्या पीएमपीमध्ये प्रवासी तसेच चालक-वाहकांसाठी माेबाईल पाणपाेईची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली अाहे.
जागतिक वसुंधरा दिनाचे आैचित्य साधत संकल्प प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एक अनाेखा संकल्प केला. वाढत्या उन्हामध्ये अंगातून घामाच्या धारा निघत असतात. त्यातच पीएमपीच्या बसचे चालक अाणि वाहक हे दिवसभर बसमध्येच असल्याने अनेकदा त्यांच्याकडील पाणी अपुरे पडते, त्याचबराेबर प्रवाशांकडेही अनेकदा पाणी नसते. अश्या प्रवाशांची तहान अाता या माेबाईल पाणपाेईमुळे भागनार अाहे. सिंहगड राेडवरुन जाणाऱ्या बसेसमध्ये या पाण्याच्या बॅग लावण्यात आल्या अाहेत. धायरी बसथांब्याला बस अाल्यानंतर येथील पाणपाेईतील पाणी या बॅगांमध्ये भरण्यात येते. पाणी पिण्यासाठी बॅगेसाेबत एक ग्लासही बसमध्ये ठेवण्यात आले अाहे. विशिष्ट अावरणाच्या या बॅग असल्यने पाणी थंड राहण्यासही मदत हाेत अाहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच साेय झाली अाहे. या उपक्रमाबद्दल प्रवाशांनी संकल्प प्रतिष्ठानचे अाभार मानले अाहे.
संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हा उपक्रम राबवित अाहेत. पुढील तीन महिने या माेबाईल पाणपाेई शहरातील बसेसमध्ये उपलब्ध करुन देणार असल्याचे निलेश गिरमे यांनी सांगितले. या उपक्रमाबाबत बाेलताना प्रतिष्ठानचे सचिव संग्राम जाधव म्हणाले, उन्हाचा कडाका वाढताेय. त्यामुळे प्रवाशांना तसेच चालक, वाहकांना बसमध्ये पाण्याची साेय असावी या उद्देशाने अाम्ही या माेबाईल पाणपाेई बसमध्ये लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागतिक वसुंधरा दिनाची निवड केली. सध्या सिंहगड राेडवरील 20 बसेसमध्ये अाम्ही या पाण्याच्या पिशव्या लावल्या अाहेत. यामुळे प्रवाशांसाठी पाण्याची साेय झाली असून त्यांनी समाधान व्यक्त केले अाहे.