इंदापूरात आंदोलकांची तब्बल दोन तास जलसमाधी; मराठा आंदोलनाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 05:07 PM2023-11-01T17:07:21+5:302023-11-01T17:07:44+5:30

आंदोलनाच्या समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीनंतर आंदोलक पाण्याबाहेर आले

Water burial of protestors for two hours in Indapur Support to the Maratha movement | इंदापूरात आंदोलकांची तब्बल दोन तास जलसमाधी; मराठा आंदोलनाला पाठिंबा

इंदापूरात आंदोलकांची तब्बल दोन तास जलसमाधी; मराठा आंदोलनाला पाठिंबा

इंदापूर : मराठा आरक्षण लागू करण्यासाठी आज कळाशी, गंगावळण भागातील वीस ते बावीस आंदोलकांनी आज (दि.१) तब्बल दोन तास भीमानदीत जलसमाधी घेतल्याने पोलीस व प्रशासकीय यंत्रणेतील अधिका-यांचे तोंडचे पाणी पळाले.
   
 'एक मराठा लाख मराठा' 'मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' यासह सरकारच्या विरोधात घोषणा देत भीमा नदीच्या पाण्यात काठापासून दोन सव्वादोन किलोमीटर अंतरावर जावून आंदोलकांनी जलसमादी आंदोलन सुरु केले होते. एका आंदोलकाची दमछाक झाल्यानंतर त्याने पाण्यात गटांगळ्या खाल्ल्या. त्याला पुढील उपचारासाठी तातडीने बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आले. प्रथमोपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली. आंदोलनाच्या समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीनंतर आंदोलक पाण्याबाहेर आले. उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Web Title: Water burial of protestors for two hours in Indapur Support to the Maratha movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.