अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 02:45 AM2018-10-29T02:45:18+5:302018-10-29T02:45:47+5:30

कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

Water from the canal left after the month | अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी

अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी

Next

पुणे : कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याआभावी जळून चाललेल्या दौंड, इंदापूर, बारामती भागातील शेतकरी सुखावणार आहेत. धरणातून ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने पाणी वाढविले जाणार आहे.

दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याची घटना घडल्यामुळे खरीप हंगामासाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करावे लागले होते. तसेच कालव्यातील लाखो लिटर पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात घुसल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. तर महिनाभर कालव्यातील पाणी बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्याने पेरलेली पिके जळून गेली. त्यामुळे कालवा दुरूस्तीची कामे तत्काळ करून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात होती. अखेर रविवारी कालव्यातून सोडण्यात आले.

जलसंपदा विभागाच्या कर्मचाºयांनी कालवा परिसरातील नागरिकांना कालव्यातून पाणी सोडल्याची कल्पना दिली. तसेच कोणीही कालव्यात उतरू नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे जसे पाणी पुढे जाईल, तसे जलसंपदा विभागाचे कर्मचारीही पाण्याबरोबर जात होते. दुरूस्ती केलेल्या ठिकाणी थांबून कालव्या बाहेर जाते का? याची पाहणी करत होते.

लष्करसाठी पाणी उचलणार
कालवा बंद असल्यामुळे लष्कर भागातील नागरिकांना पिण्यासाठी पालिकेला पाणी उचलता येत नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.परंतु, कालव्यात पाणी सोडल्यामुळे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कालव्यातून २५० एमएलडी पाणी उचलले जाईल. सायंकाळी ६ वाजता ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडले असून रात्री दहा वाजता ५00 क्यूसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. - मनीषा शेकटकर,
लष्कर व होळकर जलशुद्धीकरण केंद्र

धरणसाठ्यात अडीच टीएमसी पाणी कमी
पावसाने पाठ फिरवल्याने खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा कमी आहे.त्यातच रविवारपासून कालव्यातून इंदापूरला शेतीसाठी विसर्ग सोडण्यात आल्यामुळे धरण साठ्यात आणखी घट होणार आहे.रविवारी खडकवासला धरणसाठ्यात २४.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.
पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला,पानशेत,टेमघर,वरसगाव या धरणसाखळीत सध्या ८४.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी ९२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.टेमघर धरणाच्या दुरूस्तीसाठी धरण रिकामे केले जात आहे.त्यामुळे धरणात ०.५७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असून वरसगाव धरणात १२.७४,पानशेतमध्ये १०.४,तर खडकवासला धरणात १.२९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी धरणात २७.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.तर यंदा २८ आॅक्टोबर रोजी २४.६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

Web Title: Water from the canal left after the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.