जलसंधारणाची कामे निकृष्ट, पावसाच्या पाण्याबरोबरच निधीही गेला वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:38 AM2018-01-06T02:38:32+5:302018-01-06T02:38:43+5:30
इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या जागेत कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे कागदोपत्री जरी पूर्ण झाली असली तरी डिसेंबरअखेरच या भागात या वर्षी पावसाने उच्चांक गाठूनही सर्व बंधारे कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागणार आहे.
लासुर्णे - इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या जागेत कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे कागदोपत्री जरी पूर्ण झाली असली तरी डिसेंबरअखेरच या भागात या वर्षी पावसाने उच्चांक गाठूनही सर्व बंधारे कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागणार आहे.
इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या सर्व निकृष्ट दर्जाच्या कामांची व संबंधित वन विभागाचे अधिकारी यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यंदा सर्वत्रच पावसाने उच्चांक गाठल्याने इंदापूरच्या पश्चिम भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर
झाली होती.
ही कामे इंदापूरच्या पश्चिमेस कळस, कडबनवाडी, बिरंगुडी आदी भागात झाली. परंतु, या भागातील वन विभागाच्या हद्दीत जलसंधारणाची सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.
यामुळे डिसेंबर महिन्यातच या भागातील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. एकाही बंधाºयात पाणी नसल्याने वन्यप्राण्यांना अत्ताच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात हीच परस्थिती भयानक होणार आहे.
या वन विभागाचे अधिकारीच ठेकेदार म्हणून काम करीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अधिकारीच ठेकेदार झाला तर कामाला दर्जा मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
यामुळे वन विभागाने या इंदापूरच्या पश्चिम भागातील जलसंधारणाच्या सर्व कामाची व संबंधित अधिकाºयांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
चौकशीची मागणी
या भागातील जेथे जलसंधारणाची कामे झाली आहेत ती निकृष्ट झाली आहे. यामुळे या ठिकाणी साठलेले पाणीही वाहून गेले असून
त्यामुळे तेथील पावसाचे पाणी वाया गेले. यात शासनाचा कोट्यवधी रूपायांचा निधी वन विभागाच्या अधिकाºयांमुळे पाण्यात गेला आहे.
यामुळे वन विभागाने या भागातील सर्व कामांची तसेच वन विभागाच्या अधिकाºयांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी होत आहे.