अधिवेशनात मांडणार पाणीप्रश्न
By admin | Published: November 27, 2015 01:33 AM2015-11-27T01:33:30+5:302015-11-27T01:33:30+5:30
येथे चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चार दिवसांपासून चासकमान विभागीय कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चार दिवसांपासून चासकमान विभागीय कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या चक्रीउपोषणास भेट देऊन पाठिंबा दर्शवत चासकमानचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
वळसे पाटील म्हणाले कि पाणी देण्याचा निर्णय आमच्या विरोधात गेला त्यामुळे न्यायालय व लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा पर्याय निवडावा लागला. तरी देखील सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावा लागेल. तरी याबबत पाठबंधारे मंत्री गिरीश महाजन, गृहमंत्री राम शिंदे यांचेशी चर्चा केली आहे. तरी या ठिकाणी चासकमान च्या असलेल्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्यात तरी यांनतर देखील जर सरकारला जग आली नाहीच तर अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय हा शेतकरी राहणार नसल्याचे सांगत प्रत्येक वेळेस शेतकरी शांततेत आंदोलन करतील असे नाहीच तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील वळसे यांनी सांगितले. आंदोलन स्थळी चासकमान चे सहाय्यक अभियंता एस. जि. शहापुरे, शाखा अभियंता एस. एन. भुजबळ, शाखा अभियंता एस. बि. संतीकर उपविभागीय अभियंता यु. जि. मुंडे हे आले असता चार दिवसानंतर आलेल्या अधिकाऱ्यांवर आंदोलक शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करत चांगले फैलावर धरले व या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी या ठिकाणच्या क्षेत्रातील कोणत्या तळ्या खाली किती क्षेत्र ओलिताखाली आहे हे या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारले असता त्यांना ते आजीबात सांगता आले आही.
यावेळी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी देखील आंदोलकांची भेट घेत मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सभापती सिद्धार्थ कदम, बाजार समिती उपसभापती मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस किशोर गायकवाड, खंडाळेचे सरपंच राजेंद्र नरवडे, बाभूळसर चे सरपंच दशरथ फंड, बाजार समिती संचालक राजेंद्र गावडे, समाधान डोके, बुरुंजवाडीचे सरपंच पूनम टेमगिरे, प्रवीण कौटकर यांसह आदी मान्यवर तसेच शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
(वार्ताहर)