पावसाळी चेंबर तुंबून नागरिकांच्या घरात पाणी ; तळजाई वसाहत येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 08:00 PM2019-08-05T20:00:14+5:302019-08-05T20:01:37+5:30
पावसाळी चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याची घटना धनकवडी येथील तळजाई वसाहत येथे घडली.
धनकवडी : दहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. मेघगर्जनेसह रविवारी कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाळी चेंबर तुंबून वाहू लागले , अशाच प्रकारे चेंबरमधून बाहेर पडणारे पाणी उतारावरील दोन घरांमध्ये शिरल्याची घटना तळजाई वसाहत, वनशिव वस्ती मध्ये सोमवारी पहाटे तीन वाजता घडली.
पद्मावती परिसरातील विणकर सोसायटी पासून तळजाई पठाराकडे जाणाऱ्या मार्गावर कमानी लगत वनशिव वस्ती आहे. या वस्ती मध्ये श्रीमंत कांबळे व त्यांच्या शेजारी फत्तेह मणियार राहतात. श्रीमंत कांबळे कामानिमित्त बाहेर गेले होते. गेली दहा दिवस सुरू असलेला मुसळधार पाऊसाचा जोर रात्री अचानक वाढला होता. कांबळे यांच्या पत्नी ज्योती श्रीमंत कांबळे मुलगी व दोन वर्षेचे बाळ झोपले होते. रात्री कांबळे यांना आचानक आपले पाय ओले झाल्याचे लक्षात आले. त्या पटकन ऊठून आपल्या मुलीला व बाळाला घेेेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागल्या. मात्र आचानक दाराच्या आतुन जोर - जोरात पाणी घरात येऊ लागले. बाळाला उचले पर्यंत घरात गुडघा भर पाणी साचले होते. व साठलेल्या पाण्यात घरसामान बुडाले तर भांडी घरभर तरंगू लागली.
कांंबळे यांनी आपल्या मोठ्या मुलीला मामाला फोन करून बोलवायला सांगितले. मामा रोहीत शिंदे व कुंदन शिंदे जवळच थोड्या अंतरावर राहत असल्याने ते लगेच धावत कांबळे यांच्या घरी आले. त्यांनी घरातील पाणी उपासण्यास सुरवात केली. परंतु पाणी काही कमी होता होत नव्हते. शेवटी रोहीतने राष्ट्रशक्ती संघटनेचे पद्माकर कांबळे यांना संपर्क करून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पद्माकर कांबळे पहाटे ३;४५ वाजता घटनास्थळी आले. सर्वानी मिळून घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु चेंबर मधून पाण्याचा ओघ सुरुच होता. बांगडीवाले फत्तेह मणियार यांनाही संपर्क करुन बोलावण्यात आले. सर्वजण घरातील व बांगडीच्या दुकानातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान पहाटे ४;३० वाजता कांबळे यांनी आपत्ती कक्षाला फोन केला.
सर्वजण तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी पहाणी केली असता पंधरा दिवसापुर्वी चेंबर दुरुस्ती आणि नविन पाईप लाईन टाकण्याच्या निमित्ताने खोदाई केलेला राडा - रोडा मागील पंधरा दिवसांपासून तेथेच पडून होता. तो आद्याप पर्यंत उचलला नव्हता. असे लक्षात आले. त्यामुळे नविन चेंबरच्या पुढील तीन चेंबर ब्लाॅक झाले होते. त्यामुळे नुकतीच नव्याने टाकण्यात आलेली पाईप लाईन व नविन चेंबर ब्लाॅक झाले. व नविन चेंबर मधून पाणी थेट घरांमध्ये शिरले. सकाळी साधारण ७;४५ वाजे पर्यंत सोनवणे व जगदाळे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्योती कांबळे यांना बारा वर्षाची मुलगी व छोट्या बाळासह रात्र जागून काढवी लागली. मात्र तात्काळ मिळालेल्या मदतीमुळे कांबळे यांनी स्थानीक नगरसेवक महेश वाबळे , राष्ट्रशक्ती संघटनेचे पद्माकर कांबळे यांचे आभार व्यक्त मानले.