कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Published: September 16, 2014 11:08 PM2014-09-16T23:08:49+5:302014-09-16T23:08:49+5:30

कांदा उत्पादक शेतक:यांवर सध्या बाजारभाव वाढत नसल्यामुळे रडण्याची वेळ आली असून, सर्वसामान्य शेतक:यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे.

Water on the eyes of onion growers | कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

Next
ओझर : कांदा उत्पादक शेतक:यांवर सध्या बाजारभाव वाढत नसल्यामुळे रडण्याची वेळ आली असून, सर्वसामान्य शेतक:यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. कांद्याची होणारी सड, वजनघट व भांडवली खर्चाच्या तुलनेत दर नसल्यामुळे या वर्षी कांदापिकाकडे नजर लावून बसलेल्या शेतक:यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. 
गतवर्षी जुन्नर तालुक्यात 7 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. प्रतिकूल वातावरणातदेखील शेतक:यांनी लाखो रुपये भांडवली खर्च करून कांद्याचे चांगले उत्पादन घेतले. गतवर्षी कांद्याने उच्चांकी दर गाठला होता. प्रतिक्विंटल 1क्क्क् रुपये दर मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडले. याही वर्षी कांदा मजल मारेल, अशी शेतक:यांची अपेक्षा होती. कांदा काढणीनंतर जुलै महिन्यात प्रतिक्विंटल 26क् ते 275 रुपये दर झाला, त्या वेळी शेतक:यांनी कांदे विकले असते, तर वजनघट झाली नसती. खळखळून पैसा हातात आला असता; परंतु अधिक लालसेपोटी शेतक:यांनी कांदा बराकीमध्ये साठवून ठेवला व दरवाढीकडे लक्ष देऊन बसले. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 
नवीन सरकार केंद्रात आले व सरकारच्या धोरणामुळे कांदा जीवनावश्यक वस्तूच्या यादीत अडकला आणि कांद्याच्या वाढत्या दराला लगाम बसला. सध्या बराकींमधील कांदा सडू लागला आहे. वजनघटदेखील मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन साठवणगृहातील हा कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहे. मोठय़ा प्रमाणात सड झाल्यामुळे अपवाद वगळता भांडवली खर्चाचा मेळ घालता-घालता शेतकरीवर्गाच्या मोठय़ा प्रमाणातील आर्थिक अपेक्षेवर पाणी पडले आहे. (वार्ताहर)
 
4इजिप्तमधून आयात केलेला 6क्क् टन कांदा तसेच देशात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे हळव्या नवीन कांद्याची आवक बाजारात वाढली आहे. बंगळुरूमध्ये 35क् ते 4क्क् ट्रक नवीन कांदा विक्रीसाठी आला असल्याचे कांद्याचे व्यापारी धनेश संचेती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यापेक्षा अधिक दर वाढतील, अशी धूसर चिन्हेदेखील नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
4कांदापिकाला हेक्टरी दीड लाख रुपयांर्पयत भांडवली खर्च येत असून, सरासरी 2क् ते 25 टन हेक्टरी उत्पादन होती. या वर्षी कांदा उत्पादक शेतक:यांसाठी सध्या वाईट दिवस असल्याची चर्चा जागोजागी रंगत आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याचे दर 15क् ते 2क्क् रुपये प्रतिक्विंटल आहेत. जुलै महिन्यात शेतक:यांनी कांदा विकला असता, तर आजचा दर हा प्रतिक्विंटल 35क् ते 4क्क् रुपये पडला असता. जुलै महिन्यात कांदाविक्री न केल्यामुळे शेतकरीवर्गावर पस्तावण्याची वेळ आली आहे.

 

Web Title: Water on the eyes of onion growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.