सार्वजनिक विहिरीतून पाणीचोरी

By admin | Published: June 3, 2016 12:28 AM2016-06-03T00:28:52+5:302016-06-03T00:28:52+5:30

मारुंजीगावाला पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीतच थेट विद्युत मोटार लावून पाणी चोरी सुरू आहे. पाणी चोरीकडे डोळेझाक करण्याच्या वृत्तीमुळे पाणी चोरी करणारांची

Water harvesting from public wells | सार्वजनिक विहिरीतून पाणीचोरी

सार्वजनिक विहिरीतून पाणीचोरी

Next

वाकड : मारुंजीगावाला पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीतच थेट विद्युत मोटार लावून पाणी चोरी सुरू आहे. पाणी चोरीकडे डोळेझाक करण्याच्या वृत्तीमुळे पाणी चोरी करणारांची मुजोरी या थराला गेल्यानेच इतर ग्रामस्थांवर पाणीटंचाई झेलण्याची वेळ आली आहे. मोटारी जप्त करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गावात सध्या नळपाणी पुरवठा योजनेतून पुरवठा होणाऱ्या पाण्याची नळाला मोटारी लावून चोरी होण्याचे प्रकार सर्रास सुरू होते. त्याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार करूनही आजवर कारवाईबाबत उदासीनता दाखविली गेली. आता या पाणीचोरांची मुजोरी इतकी वाढली आहे. गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या विहिरीतच दोन मोटारी टाकून पाणी उपसण्याचा प्रताप सुरू आहे. यापैकी एक मोटार एक एचपीची असून, दुसरी मोटार लपवून ठेवली आहे.
सव्वा इंच पाइप लावून व्यवसायासाठीही बेसुमार पाणी उपसले जात आहे. याच विहिरीतून पाणी उपसून टाकीत टाकून लोकांना वापरण्यासाठी वितरित केले जात आहे. गावाला पाणीपुरवठा कुठून व कसा करावा याबाबत सर्वच स्तरांतून धडपड सुरू आहे. असे असताना याप्रकारे पाणीचोरी करण्याचा प्रकार म्हणजे इतर ग्रामस्थांवर अन्याय असल्याची संतापजनक भावना व्यक्त होत आहे. या पाणीचोरांवर कठोर, दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते
अंकुश जगताप यांनी ग्रामसेवक सयाजी क्षीरसागर यांच्याकडे
केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Water harvesting from public wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.