‘वॉटर हार्वेस्टिंग’चे पाणी रस्त्यावर

By admin | Published: October 17, 2014 11:17 PM2014-10-17T23:17:55+5:302014-10-17T23:17:55+5:30

नवीन इमारतींसाठी राबवीत असलेल्या छतावरील ‘वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रमातील पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याऐवजी थेट रस्त्यावर सोडले जात आहे.

Water Harvesting Water Park | ‘वॉटर हार्वेस्टिंग’चे पाणी रस्त्यावर

‘वॉटर हार्वेस्टिंग’चे पाणी रस्त्यावर

Next
पिंपरी : पाणी जतन करण्याचा एक भाग म्हणून महापालिका नवीन इमारतींसाठी राबवीत असलेल्या  छतावरील ‘वॉटर हार्वेस्टिंग’ उपक्रमातील पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याऐवजी थेट रस्त्यावर सोडले जात आहे. या उपक्रमाची संकलित माहितीही महापालिकेकडे नसल्याने प्रशासन पाणीसाठवणुकीकडे किती गांभीर्याने पाहते, याबाबत साशंकता आहे. परिणामकारक यंत्रणा निर्माण केली नसल्याने या उपक्रमाचे पूर्ण फलित साध्य होत नसल्याचे उघड झाले आहे. 
बोअरवेल खोदून अर्निबध उपसा केला गेल्याने अनेक  वर्षात भूजलाचा स्तर खालावला गेला. त्यामुळे राज्यभरात 14 फेब्रुवारी 2क्14 च्या शासनादेशाने शिवकालीन पाणी साठवण योजनेतून ठिकठिकाणी भूजलपातळी वाढविण्याचे निश्चित झाले. यानुसार पिंपरी चिंचवड  महापालिकेने 2क्क्9 मध्ये 3 गुंठय़ापुढील बांधकामांना व जुन्या बांधकामांचे नुतनीकरणास परवानगी देताना छतावरचे पाणी जमिनीत जिरवणो बंधनकारक केले. 
त्यासाठी 1क्क् फूट खोल बोअरवेल खोदून पाणी जमिनीत मुरविण्याचे स्पष्ट केले. मात्र विभागीय प्रभाग स्तरावरील अधिकारी व महापालिकेच्या बांधकाम विभागात याप्रकरणी योग्य ताळमेळ नसल्याने या उपक्रमाची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेनुसार होत नसल्याने किमान पुढील पावसाळ्यात तरी पाणीसंवर्धनासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण होईल अशी अपेक्षा जलतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
 
कोणावरही 
कारवाई नाही
छतावरील पाणी जमिनीत जिरवणो बंधनकारक असताना शहरात आजवर नियमांचे उल्लंघन करणा:या एकाही मिळकत धारकावर कारवाई करण्यात आली नाही. याची पडताळणी करण्याची तसदीही प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने या उपक्रमातला फोलपना उघड झाला आहे. याप्रकरणी पूर्णत्व दाखला रोखणो तर दूरच पण कोणाला साधी समजही देण्यात आली नाही.   
 
पूर्णत्वाचा दाखला मिळताच डोळेझाक
बांधकामास पूर्णत्वाचा दाखला मिळेर्पयत अनेक जणांकडून वॉटर हार्वेस्टिंग केल्याचे अधिका:यांना दाखविले जाते. मात्र एकदा दाखला मिळाल्यावर छतावरचे पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे पाणीबचतीचा कार्यक्रम केवळ कागदावरच राहत असून त्याला मनापासून प्रतिसाद मिळविण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
 
पाहणीस हवे तज्ज्ञांचे स्वतंत्र पथक
वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कशाप्रकारे बसविली जाते याबाबत बांधकाम सुरु असतानाच तांत्रिक मार्गदर्शन मिळणो गरजेचे आहे. छतापासून विशिष्ट पद्धतीचे पाईप लावणो, सुरुवातीच्या  2 पावसाचे पाणी भूजलात मिसळणो रोखण्यास ते वाहिनीच्या बाह्यमार्गातून खुल्यावर सोडणो, भूजलात कचरा जाण्याचे रोखण्यास वाहिणीत गाळणीप्रणाली बसविणो आदी तांत्रिक कामांचा त्यात समावेश आहे. मात्र कोणत्याही मिळकतधारकाने बांधकाम करताना महापालिकेकडून शास्त्रीयदृटय़ा मार्गदर्शन मिळत नाही. बांधकाम झाल्यावर पाहणीचा सोपस्कार पार पाडले जातात. वास्तविक पुणोस्थित भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शन व निगराणीत काम झाल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
 
बांधकामांच्या छतावर वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे की नाही याची पडताळणी करून मगच त्यांना परवानगी दिली जाते. सदर ठिकाणी पाहणी करण्याचा अधिकार प्रत्येक प्रभाग स्तरावरील अधिका:यांना दिला आहे. त्यांनी पाहणी करून पाठविलेल्या प्रस्तावानुसारच इमारतींना पूर्णत्वाचे दाखले दिले जातात. त्यामुळे कोणत्या मिळकतधारकांनी प्रकल्प राबविला आहे, कोणी नियमांचे उल्लंघन केले याची एकत्रित माहिती ठेवली जात नाही.
- ए. ए. पठाण, उपशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
 
दुष्काळ पडला, नळाला एकवेळ पाणी आले नाही तर मोठा गहजब होतो. यावर्षी पाऊस लांबल्यावर तेवढय़ापुरती लोकांची चिंता दिसून आली. मात्र  पाऊस सुरु झाल्यावर पाणी साठवणुक ीकडे फारसे  गांभीर्याने पाहिले जात नाही. पाणी हे अनमोल असून, त्याचे जतन करण्यास प्रत्येकाने जातीने पुढाकार घेण्याशिवाय गत्यंतर नाही. लोकांमध्ये प्रबोधनासाठी विभागातर्फे मोहीम राबविली जात आहे. त्याकामी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. 
- राजेश सावळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग, पुणो
 

 

Web Title: Water Harvesting Water Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.