वेल्ह्याची ‘पाणी’पंचाईत!

By admin | Published: May 2, 2015 05:23 AM2015-05-02T05:23:50+5:302015-05-02T05:23:50+5:30

वर्षभरापूर्वी शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी राज्यात नगर पंचायती करण्याची प्राथमिक उद्घोषणा केली. त्यात वेल्हे ग्रामपंचायतीचाही समावेश असून

Water of irrigation water! | वेल्ह्याची ‘पाणी’पंचाईत!

वेल्ह्याची ‘पाणी’पंचाईत!

Next

पुणे : वर्षभरापूर्वी शासनाने तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी राज्यात नगर पंचायती करण्याची प्राथमिक उद्घोषणा केली. त्यात वेल्हे ग्रामपंचायतीचाही समावेश असून, तेथे सुरू असलेली पाणी योजना थांबविण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला दिले आहे. शासन नगरपंचायतीची घोषणा करेना आणि जिल्हा परिषद आपले मानेने अशी स्थिती गावची झाली असून त्यांची ‘पाणी’पंचाईत झाली आहे. आज विशेष ग्रामसभा घेवून ‘नगर पंचायत नको, पण पाणी द्या,’ असा ठराव करण्यात आला आहे.
३१ मे २०१४ रोजी शासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, मुळशी तालुक्यातील पौड, वेल्हे तालुक्यातील वेल्हे आणि मावळ तालुक्यात वडगाव या ग्रामपंचायतींच्या नगर पंचायती होणार आहेत. मात्र, शासन अध्यादेश काढत नसल्याने या ग्रामपंचायतींत अडचणी निर्माण होत आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ने ‘तालुका मुख्यालयी नगर परिषदा कधी?’ असे वृत्त २९ एप्रिल रोजी प्रसिद्ध करून गावकारभाऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
यातील वेल्हे ग्रामपंचायतीसाठी २०१४ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ९२ लाख ६५ हजारांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असून, तिचा ५४,११,९९३ रुपयांचा पहिला हप्ताही डिसेंबर २०१४ रोजी ग्रमापंचायतीच्या खात्यात जमा झाला आहे. आता जिल्हा परिषदेतर्फे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे ग्रामपंचायतीला पत्र पाठवून ही योजनाच रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. बेल्हे बुद्रुक हे गाव नगर पंचायत म्हणून घोषित करण्यात आले आहे. तरी हे गाव अधिसूचनेनुसार नागरी क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. नागरी क्षेत्र घोषित करण्यात आलेल्या गाव/वाड्यांसाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला मंजुरी किंवा मंजुरी देण्यात आलेल्या कामांची अंमलबजावणी रद्द करण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तरी, येथील पाणी योजनेचे काम रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला पहिल्या हप्त्यासाठी दिलेली ५४ लाख ११ हजार ९९३ रुपयांची रक्कम तत्काळ या कार्यालयाकडे वर्ग करावी, असेही सुचविले आहे. त्यामुळे गावकारभारी हवालदिल झाले आहेत.

Web Title: Water of irrigation water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.