कळमोडीचे पाणी पुन्हा अडवले
By admin | Published: November 24, 2015 12:48 AM2015-11-24T00:48:59+5:302015-11-24T00:48:59+5:30
कळमोडी धरणातून पोलीस बंदोबस्तामध्ये रविवारी सोडण्यात आलेले पाणी स्थानिक शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी पुन्हा बंद केले.
चासकमान : कळमोडी धरणातून पोलीस बंदोबस्तामध्ये रविवारी सोडण्यात आलेले पाणी स्थानिक शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी पुन्हा बंद केले.
शेतकरी व कृती समितीला विश्वासात न घेताच पाटबंधारे विभागाने पोलीसबळाचा वापर
करून कळमोडी धरणातले पाणी १९५ क्युसेक्स वेगाने आरळा नदीपात्रात सोडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. पहिले
पाणी सोडले त्या वेळेस
शेतकऱ्यांनी पाणी बंद केले होते. चासकमान शाखा अभियंता पडवळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करूनच
पाणी सोडण्यात येईल, असे त्या वेळी सांगितले होते.
पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या उद्रेकाच्या भीतीपोटी पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणात रविवारी पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेचे आश्वासन देऊनही, रविवारी कळमोडी धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी धरणावर जात पाण्याच्या विसर्ग थांबवला. यापुढे संबंधित अधिकारी यांनी शेतकरी कृती समितीबरोबर चर्चा केल्याशिवाय धरणातून पाण्याचा एक थेंब खाली जाऊन देणार नाही, असा ठाम निर्णय घेतला.
पाणी बंद करण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गोपाळे, लक्ष्मणराव मुके, पांडुरंग गोपाळे, धारू कृष्णा गवारी, संतोष गोपाळे, काशीनाथ गोपाळे, सुदाम पवार, संतोष कदम, गणपत गोपाळे यांसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)