भोरकरबाडी बंधाऱ्यातून पाण्याची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:21 AM2020-12-03T04:21:52+5:302020-12-03T04:21:52+5:30
भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातील पाण्यावर कळंब ( ता. इंदापूर ) येथील व कळंबोली ( ता. माळशिरस ) येथील हजारो हेक्टर शेती ...
भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातील पाण्यावर कळंब ( ता. इंदापूर ) येथील व कळंबोली ( ता. माळशिरस ) येथील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. अनेक शेतकºयांनी उन्हाळ्यात शेतीला पाणी कमी पडू नये यासाठी दरवर्षी शेतकरी लोकवर्गणीतून बंधाऱ्यातील गळती थांबविण्यासाठी कामे करून घेतात. यावर्षी शेतकरी अवकाळी पावसामुळे अक्षरश: उध्वस्त झाला आहे.वेळीच पाणी गळती थांबवली नाही तर ऐन उन्हाळ्यात बंधारा कोरडा पडण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ पाणी गळती थांबवावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे.
—————————————————
फोटो ओळी:- भोरकरवाडीच्या बंधाऱ्यातील पाणी गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात बंधारा कोरडा पडण्याची शक्यता आहे.
०२१२२०२०-बारामती-०६
——————————————
===Photopath===
021220\02pun_2_02122020_6.jpg
===Caption===
भोरकरवाडीच्या बंधाºयातील पाणी गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात बंधारा कोरडा पडण्याची शक्यता आहे.