उजनीतून भीमेत सोडले पाणी
By admin | Published: March 31, 2015 12:24 AM2015-03-31T00:24:27+5:302015-03-31T00:24:27+5:30
सोलापूरला पिण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बावडा भागातील तसेच माढा तालुक्यातील शेतीच्या
बावडा : सोलापूरला पिण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बावडा भागातील तसेच माढा तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील (बॅक वॉटर) शेतकऱ्यात मात्र कमालीची चिंता पसरली आहे.
सध्या उजनी धरणात २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
या धरणातून बुधवार (दि. २५) पासून ७ हजार क्युसेसने सोलापूरसाठी पाणी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे भीमा नदीचे पात्र
काठोकाठ भरुन भीमा नदी
वाहत आहे.
पुढील दोन महिन्यात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे.
ही बाब गंभीर असतानाही तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देत नाहीत. या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)