सुप्यात प्राण्यांसाठी शिक्षकांनी बनवला पाणवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:38+5:302020-12-27T04:08:38+5:30
सुपे येथील छप्पन मेरू मंदीर परिसरात येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येवुन वन्य प्राण्यांकरिता पाणवठा तयार करून दिला. ...
सुपे येथील छप्पन मेरू मंदीर परिसरात येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येवुन वन्य प्राण्यांकरिता पाणवठा तयार करून दिला. या पाणवठयाचे समर्पन बारामतीचे वन परिमंडल अधिकारी अमोल सातपुते व उषा भोंडवे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सातपुते म्हणाले की, शाळा, पालक, विद्यार्थी व शिक्षक आदींनी सक्रीय सहभाग दिल्यास पर्यावरणाची मोठी जपणूक होण्यास मदत होईल. तसेच इतर सर्व शाळा व सामाजिक संस्थांनी असे पर्यावरणीय उपक्रम घेतल्यास वनविभाग सर्वतोपरी मदत करेल असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमात शिक्षकांनी पाणवठ्याच्या आकाराचा खड्डा तयार करून त्याला पाचट व काळी माती यांचे अस्तर देऊन त्यावरती दगड-गोट्यांचे अस्तरीकरण केले. त्यामुळे येथील पाणवठा सहा हजार लिटर क्षमतेचा झाला आहे. याकरिता वनविभागाचे अधिकारी सातपुते, माया काळे, गणपत भोंडवे, सुरेश गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. माजी सरपंच मंदा खैरे, दत्तात्रय कदम, नितीन शितोळे, दत्तात्रय शेंडगे यांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेतल्याचे प्राचार्य योगेश पाटील यांनी सांगितले.
सुपे येथील विद्याप्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी वन्यप्राण्यांसाठी श्रमदानातून तयार केलेला पाणवठा.
२६ सुपे