नीरा खो-यातील धरणं काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:21 AM2017-07-27T06:21:40+5:302017-07-27T06:21:55+5:30

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर; तर सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यांना वरदान ठरलेल्या नीरा-देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांमधील पाण्याची पातळी समाधानकारक वाढत आहे.

water in nerra river | नीरा खो-यातील धरणं काठोकाठ

नीरा खो-यातील धरणं काठोकाठ

Next

सोमेश्वरनगर : पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर; तर सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यांना वरदान ठरलेल्या नीरा-देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांमधील पाण्याची पातळी समाधानकारक वाढत आहे. गुंजवणी धरणाचा लावादाचा निर्णय अजून न झाल्याने गुंजवणीसह तिन्ही धरणांमधून येणाºया पाण्यामुळे वीर धरण ८८ टक्के भरले आहे.
पंधरा दिवसांपासून नीरा-देवघर, भाटघर आणि गुंजवणी या धरणक्षेत्रांत पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांतील पाण्याचा साठा समाधानकारकरीत्या वाढू लागला आहे. धरणांची टक्केवारी आता ७० च्या पुढे गेली आहे. या वर्षी धरणक्षेत्रात पाऊस पडत असला, तरीही पूर्वेचा भाग ताहनलेला आहे.
नीरा-देवघर धरणक्षेत्रात १,३५९ मिलिमीटर, भाटघर धरणक्षेत्रात ४०५ मिलिमिटर तर वीर धरणक्षेत्रात ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नीरा-देवघर धरणात ७४ टक्के, भाटघर धरणात ७२ टक्क्के तर वीर धरणात ८८ टक्के अशी वाढ झाली आहे.
दोन-तीन वर्षांपासून नीरा खोºयात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. गेल्या वर्षी पाऊस अशाच प्रकारे उशिरा सुरू झाला होता. काही दिवसांतच सर्व धरणे १०० टक्के भरली होती. तर, त्याच्या गतवर्षी गुंजवणी धरण वगळता इतर तीन धरणे १०० टक्के भरली नव्हती. जूनमध्ये पडणाºया मॉन्सूननेही अनेक भागांमधून दगा दिल्याने विहीर व बोअरवेलच्या पाणी पातळीत फरक पडला नाही.
सध्या ऊसलागवडीचा हंगाम सुरू असून विहिरी आणि बोअरवेलने तळ गाठला आहे. नीरा खेºयातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात हजारो एकर उसाची लागवड झाली आहे. पाणीच नसल्याने मोठा ऊस जगवयाचा की लहान लागवड जगवयाची, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे.

Web Title: water in nerra river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.