सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांच्या हद्दीत मिळेना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:39+5:302021-03-25T04:12:39+5:30

पुणे : वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अधिकारी आणि पाणी सोडणारे कर्मचारी नगरसेवकांनाही उडवाउडवीची उत्तरे देतात. ...

Water not available within the limits of ruling BJP corporators | सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांच्या हद्दीत मिळेना पाणी

सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांच्या हद्दीत मिळेना पाणी

Next

पुणे : वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अधिकारी आणि पाणी सोडणारे कर्मचारी नगरसेवकांनाही उडवाउडवीची उत्तरे देतात. सत्तेत असतानाही नगरसेवकांची ही अवस्था असेल तर दाद कोणाकडे मागायची, अशी कैफियत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडली. पाण्याविषयी नगरसेवकांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये सभागृह नेत्यांपुढे तक्रारींचा भडिमार केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक हैराण झाल्याचे पहायला मिळाले.

शहरातील विविध भागात असलेली पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत बुधवारी पालिकेत बैठक घेतली. नगरसेविका राणी भोसले, रुपाली धाडवे, वर्षा साठे, रघू गौडा, प्रकाश ढोरे, योगेश समेळ पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप, मनीषा शेकटकर यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून अपर इंदिरानगर, धनकवडी, इंदिरानगर, पर्वतीगाव, कसबा पेठ, खडकी, जुना पुणे-मुंबई रस्ता, या परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत असून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडे यासाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील केवळ दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार यावेळी केली.

---

पालिकेत सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप काम करत आहे. सत्ताधारी असतानाही आम्हाला पाणी मिळत नसेल तर काय? उपयोग? पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की, एक दिवस सुरळीत पाणी मिळते, पुन्हा दुसऱ्या दिवशी कमीदाबाने पाणी मिळते. भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागात जाणीपूर्वक पाणीपुरवठा कमी दाबाने होतो की काय? अशी शंका यावेळी सभासदांकडून व्यक्त केली.

---

शहरातील सर्व भागांना आवश्यक पाणीपुरवठा व्हायला हवा. प्रशासनाने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. काही भागातील पाणी सोडणारे (व्हॉल्व मन) मनमानी करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

Web Title: Water not available within the limits of ruling BJP corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.