नायगावला ३० वर्षांनंतर जुन्या कॅनॉलमधून पाणी
By admin | Published: January 10, 2017 02:34 AM2017-01-10T02:34:00+5:302017-01-10T02:34:00+5:30
नायगाव (हवेली) येथे ३० वर्षांनंतर शेतीसाठी जुन्या कॅनॉल फाटा नंबर १३ मधून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. येथील यशवंत पाणीपुरवठा संस्था काही
कोरेगाव मूळ : नायगाव (हवेली) येथे ३० वर्षांनंतर शेतीसाठी जुन्या कॅनॉल फाटा नंबर १३ मधून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. येथील यशवंत पाणीपुरवठा संस्था काही दिवसांपासून वीजबिल थकबाकीमुळे बंद असल्याने यशवंत पाणीपुरवठा संस्था, ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभागाकडे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
त्यास अनुसरून कार्यकारी अभियंता शेलार व लोणी काळभोर शाखाधिकारी माने यांनी पाणीपुरवठ्यासाठीचा पाट दुरुस्ती करण्यासाठी मशिनरी उपलब्ध करून दिली व पाट दुरुस्तीचे संपूर्ण काम करण्यात आले.
प्रास्तविकात रतन गुलाबराव चौधरी यांनी पाणी मिळण्यासाठीच्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र नामदेव पवार व्हा.चेअरमन यशवंत पाणीपुरवठा संस्था यांनी केले. (वार्ताहर)