पाणी हमारा जीवन हैै, इसे क्यंू अपने हातों से खत्म करे!

By admin | Published: December 30, 2016 04:27 AM2016-12-30T04:27:49+5:302016-12-30T04:27:49+5:30

नैनीताल जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ...येथील सरोवर, निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू.. मात्र, या तलावाला आता ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा

Water is our life, why do it end with your hands! | पाणी हमारा जीवन हैै, इसे क्यंू अपने हातों से खत्म करे!

पाणी हमारा जीवन हैै, इसे क्यंू अपने हातों से खत्म करे!

Next

बारामती : नैनीताल जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ...येथील सरोवर, निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगा म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू.. मात्र, या तलावाला आता ग्लोबल वॉर्मिंग आणि पाण्याचा बेसुमार उपसा यांमुळे फटका बसू लागला आहे. यावर बारामती येथे भरलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये उत्तराखंड राज्यातील स्मृती पांडे या अवघ्या ११ वर्षांच्या मुलीने संशोधनपर अहवाल सादर केला. पाणीबचतीचे आवाहन करताना ‘पाणी हमारा जीवन हैै, तो हम क्यूं अपने हातों से अपनाही जीवन खत्म कर रहे हैै’ असे आवाहनही स्मृती करते.
स्मृतीच्या या संशोधन अहवालाचे सर्वांनीच कौतुक केले. तसेच पाणीबचतीचे महत्त्व ही काळाची गरज असल्याची जाणीवही या निमित्ताने साऱ्यांना झाली. भूजलाच्या अतिरिक्त उपशामुळे मागील उन्हाळ्यात नैनीताल सरोवराची पाणीपातळी प्रचंड खालावली. वजा पाच फुटांपर्यंत पाणीपातळी खालावल्याने येथील निसर्गतज्ज्ञ, पर्यावरणवादी यांच्यातून चिंता व्यक्त होऊ लागली. नेमका हाच विषय डोळ्यांसमोर ठेवत स्मृती आणि तिच्या सहकाऱ्यांनी यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिच्या शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले. नैनीताल शहरामध्ये दररोज १.५ मिलियन भूजलाचा उपसा होत आहे.
या अतिरिक्त भूजल उपशामुळे नैनीताल सरोवराची पाणीपातळी घटत असल्याचेही समोर आले. तसेच पृथ्वीचे वाढते तापमान, कमी झालेला पाऊसकाळ यामुळे भूजलपातळीही प्रचंड प्रमाणात खालावत आहे.
याचा परिणाम म्हणून दरवर्षी मे महिन्यामध्ये साधारण पाणीपातळीपेक्षा १२ फुटाने सरोवराची पाणीपातळी खालावते. मात्र, मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ही पातळी १७ फुटाने खालावली. म्हणजेच वजा ५ फुटाने पाणीपातळी खालावल्याचा निष्कर्ष स्मृती आणि तिच्या सहकाऱ्यांनी काढला.
केवळ अहवाल तयार करण्यापुरतेच ही बच्चेकंपनी थांबली नाही, तर त्यांनी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ अबाधीत राहावे, त्याचे सौंदर्य चिरकाळ टिकावे यासाठी ‘पाणी बचाव लोकअभियान’ सुरू केले. पर्यावरणासंबंधी संवेदनशीलपणे विचार करणाऱ्यांना जमवून पाणीबचतीचे संदेश देण्यासाठी हे बालवैज्ञानिक सरसावले आहेत. उत्तराखंड राज्यातून १६ बालवैज्ञानिकांसह राज्य पथकप्रमुख कमला पंत, प्रभारी निर्मल रावत, शिक्षक हिमांशू पांडे, डॉ. बी. सी. पांडे, एस. एस. मेहरा, मंजुला पांडे आदी बारामती येथील राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेला उपस्थित
राहिले आहेत.

- स्मृती सांगते की, आम्ही पाणी वापरासबंधी समाजाचा आर्थिक स्तर तपासला. यामध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले. ज्यांचा आर्थिक स्तर चांगला आहे अशा व्यक्तींकडे पाण्याचे स्रोत आहेत. यामध्ये प्रमुख्याने बोअरवेलचा समावेश आहे. या व्यक्ती दिवसाला १ हजार ५०० लिटर पाणी वाया घालवतात, तर आर्थिक स्तर कमी असणाऱ्या व्यक्ती आणि ज्यांच्याकडे पाण्याचे स्वमालकीचे स्रोत नाहीत अशांना दिवसाला फक्त १५० ते २०० लिटरच पाणी पुरते. हे चित्र थांबायाला हवे. पाण्याचा पूनर्वापर होणे गरजेचे आहे, असेही यावेळी स्मृती पांडे हिने सांगितले.

Web Title: Water is our life, why do it end with your hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.