वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया
By राजू हिंगे | Published: April 21, 2023 02:45 PM2023-04-21T14:45:22+5:302023-04-21T14:45:33+5:30
वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत
पुणे : पुणे महापालिकेच्या वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला काही अंतरावर फुटली आहे. त्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
खडकवासला धरणातून वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे सुमारे दीड ते दोन मीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्या गेलेल्या आहेत. यापैकी जुनी जलवाहिनी फुटली असून धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलावरून पाण्याचा उंच फवारा उडत होते. एका बाजूला पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पालिकच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंपिगचा पाणीपुरवठा बंद केला आहे. या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम होती घेतले आहे.
जुन्या जलवाहिन्यांचा प्रश्न एैरणीवर
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीसह इतर भागात जाणाऱ्या जलवाहिन्या तब्बल वीस वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या आहेत. त्यातील अनेक जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्या अचानक फुटुन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या जुन्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.
जलवाहिनी दुरूस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात
वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे या केद्रांवरून पाणीपुरवठा होणा०या सर्व भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. - अनिरूध्द पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख , पुणे महापालिका