काठापूर बुद्रुक येथे पाणपोईची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:57+5:302021-04-15T04:09:57+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता ...
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे पिण्यासाठी शुद्ध व थंड पाणी मिळावे या उद्देशाने ही पाणपोई सुरु करण्यात आली आहे. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, सरपंच अशोक करंडे,उपसरपंच विशाल करंडे, पोंदेवाडीचे उपसरपंच महेंद्र पोखरकर,ग्रामपंचायत सदस्य पप्पू खुडे, दादाभाऊ गायकवाड, अशोक जोरी, मधुकर जोरी,रोहीदास तुळे,बाबाजी करंडे,विजय कुलकर्णी,एकनाथ ढमाले,संतोष करंडे आदी उपस्थित होते.
सध्याच्या परिस्थितीत उन्हाळा मोठ्या प्रमाणावर सुरु झाला असल्याने मानवी शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.त्यावेळी पिण्यासाठी थंड व शुद्ध पाणी आवश्यक असते.अशावेळी सुरू केलेली ही पाणपोई नक्कीच नागरिकांसाठी फायद्याची ठरेल, असे यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले म्हणाले.
१४ मंचर पाणपोई