इंदापुरात कमी दाबाने पाणीपुरवठा
By admin | Published: May 8, 2015 05:16 AM2015-05-08T05:16:00+5:302015-05-08T05:16:00+5:30
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खडकवासला कालव्याद्वारे तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या
इंदापूर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खडकवासला कालव्याद्वारे तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना देवून तब्बल २१ दिवस उलटून गेले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे हीच मागणी करून पाच दिवस उलटून गेले. तरी देखील काही ही उपयोग न झाल्यामुळे इंदापूर नगरपरिषदेचे प्रशासन हतबल झाले आहे.त्वरित उपाय न झाल्यास लोकांचा असंतोष भडकेल, असे चित्र दिसत आहे. मार्च २०१५ मध्ये तरंगवाडी तलावाची पाण्याची पातळी खालावल्यानंतर, खडकवासला कालव्याद्वारे तलावात दोन तीन दिवस पाणी सोडण्यात आले. पाण्याची पातळी चार फुटाने वाढली. तत्पूर्वी १८ मार्चपासून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येवू लागला. पाण्याचा वापर व बाष्पीभवन यामुळे पाण्याची पातळी खालावली.
या घडामोडी होवून तब्बल २१ दिवस उलटून गेले. मात्र कालव्याचे पाणी तलावापर्यंत पोहोचले नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे,पाणी टंचाई उग्र रूप घेवू लागली आहे. दिवसाआड अपूरा पाणी पुरवठा होत असल्याने लोकभावना भडकत आहे. राजकीय मंडळीची बेपर्वाई, पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ धोरणाचे खापर नगरपरिषदेच्या डोक्यावर फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र दिसत आहे.