नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राला जलशुद्धीकरण व शीतयंत्र भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:54+5:302021-07-08T04:08:54+5:30
मंगळवारी सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते शीतयंत्राचे पूजन व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. ...
मंगळवारी सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते शीतयंत्राचे पूजन व फीत कापून लोकार्पण करण्यात आले.
या वेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी जि. प. सदस्य विराज काकडे, ग्रामपंचायतीच्या सदस्या राधा माने, वैशाली काळे, अभिषेक भालेराव, अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना जोशी, राजेश चव्हाण, डॉ. अक्षय मव्हाण, डॉ. समीक्षा कांबळे, आरोग्य सहायक बेबी तांबे, आरोग्यसेवक शिवाजी चव्हाण, पिंटू गायकवाड, बाप्पू भंडलकर उपस्थित होते.
नीरा पूलक मंच परिवाराचे अध्यक्ष मनोज शहा, महिला अध्यक्ष नेहा शहा, उपाध्यक्ष नवेंदू शहा, रेणुका कोठाडिया, शैला शहा, संगीता जैन, जयश्री जैन, स्वाती दुरगे, नयना नाकील, उज्ज्वला जैन यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन तनुजा शहा यांनी केले. प्रास्ताविक नेहा शहा यांनी केले. तर आभार महामंत्री- रूपा शहा यांनी मानले.