घोडमधून पाणी सोडले ; पिकांना दिलासा

By admin | Published: February 27, 2015 11:51 PM2015-02-27T23:51:35+5:302015-02-27T23:51:35+5:30

चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली.

Water released from the horse; Relief to Crops | घोडमधून पाणी सोडले ; पिकांना दिलासा

घोडमधून पाणी सोडले ; पिकांना दिलासा

Next

निमोणे : चिंचणी येथील घोड धरणामधील पाणी दि. २६ पासून सोडण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी पी. पी. तनपुरे यांनी दिली. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण हे पुणे व अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर आहे. धरणाची साठवण क्षमता ७६३९ दलघफू एवढी असून, मृत पाणीसाठा २१६२ दलघफू एवढा असून, उपयुक्त पाणीसाठा ३१८३ दलघफू एवढा आहे. दरम्यान, धरण बांधणीनंतर आजपर्यंत धरणाच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झालेली आहे. सध्या धरणामध्ये ५३५५ दलघफू एवढा पाणीसाठा असून, तो ५८ टक्के इतका आहे.
या धरणाच्या पाण्यावर शिरूर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील सुमारे सहा हजार हेक्टर बारमाही सिंचनाखाली आहे. त्याशिवाय रांजणगाव औद्योगिक वसाहत व घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांना औद्योगिक उपयोगासाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीकाठच्या गावाबरोबरच श्रीगोंदा शहर, काष्टी ग्रामपंचायत या मोठ्या लोकसंख्येच्या गावांनाही पिण्यासाठी पाणीपुरवठा येथूनच होतो.
धरणाच्या खालच्या भागामध्ये शिरूर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शिरसगाव, धनगरवस्ती, नलगेमळा, नांद्रेमळा, खोरेवस्ती व तांदळी-संगम हे सहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्यावर सुमारे दोन हजार हेक्टर ओलिताखाली आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर
आणि बंधाऱ्यांना असणाऱ्या
मोठ्या प्रमाणावरील गळतीने हे बंधारे कोरडे पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर
होती. शेतकऱ्यांनी वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Water released from the horse; Relief to Crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.