उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:17 AM2019-01-16T01:17:34+5:302019-01-16T01:17:49+5:30

८१०० क्युसेक्सने विसर्ग : एकूण १० दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Water released from Ujani in Bhima River | उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी

उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी

Next

इंदापूर : उजनी धरणातून भीमानदीला संक्रांतीच्या मुहर्तावर मंगळवारपासून ८१०० क्युसेक्सने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे पंढरपूर व सोलापूर शहरासाठी व नदीकाठच्या गावांसाठी पाणी सोडल्याचे उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वीजनिर्मितीसाठी सोमवारी सायंकाळी ८ वाजल्यापासून १६०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, तर नदीला मंगळवारी सकाळी ८ वाजता ६५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे, असे एकूण ८१०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.


औज बंधाऱ्याची व पंढरपूरच्या बंधाºयाची पाणीपातळी कमालीची खालावली असून रब्बी हंगाम पण सुरू असल्याने सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना व सोलापूर शहराला पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाणी सोडण्याचे प्रशासनाने चार दिवसापूर्वीच जाहीर केले होते. त्यादृष्टीने उजनी धरण व्यवस्थापन विभागाने मंगळवारी मकरसंक्रांतीच्या महूर्तावर पाणी सोडले आहे. असे असले तरी धरणाची पाणीपातळी कमालीची कमी झालेली दिसून येते. गेल्या वर्षी १५ जानेवारीला एकूण १०२ टक्के धरणात पाणी होते. आज रोजी धरणात ३९.७३ टक्केएवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे येणाºया काळात सोलापूर जिल्ह्यातील शेती पुढे मोठे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणीपातळी ४९३.७२० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा २४०५.६३ दलघमी आहे. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ६०२.८२ दलघमी असून त्याची टक्केवारी ३९.७३ टक्के आहे. उजनीमध्ये सध्या एकूण ८४.९४ टीएमसी पाणी असून त्यामध्ये केवळ २१.२९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

Web Title: Water released from Ujani in Bhima River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी