धरणांतील पाणीसाठा कमी! पाणलोट क्षेत्रात नाही पाऊस, कपात होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 05:03 AM2018-07-01T05:03:31+5:302018-07-01T05:03:45+5:30

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असला तरी पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात घट होत चालली आहे.

Water reservoir in the dam! The administration clarified that no rain falls in the catchment area | धरणांतील पाणीसाठा कमी! पाणलोट क्षेत्रात नाही पाऊस, कपात होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट

धरणांतील पाणीसाठा कमी! पाणलोट क्षेत्रात नाही पाऊस, कपात होणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट

Next

पुणे : मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असला तरी पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. पावसाने आणखी काही दिवस ओढ दिली तर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. मात्र, सध्या तरी पुण्यात पाणी कपात करण्याचा कोणताही विचार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
मॉन्सून काही दिवस आधी दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार मुंबईसह कोकण व विदर्भात काही भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र, पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास अद्याप सुरुवात झाली नाही. त्यातच नियोजनानुसार दौंड-इंदापूर भागातील नागरिकांना शेती व पिण्यासाठी २४ मार्च २०१८ ते १७ जून २०१८ या कालावधीत कालव्यातून पाणी सोडण्यात आले.
महिनाभरापूर्वी धरणात चार टीएमसीपेक्षा जास्त असलेला पाणीसाठा आता ३.३५ टीएमसीपर्यंत आला आहे. जून महिना संपला
असून पुण्यात केवळ एकच दिवस
५५ मि.मी.पर्यंत पाऊस पडला.
गेल्या काही दिवसांपासून शहर
व धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या
सरी बरसत आहेत. आणखी
काही दिवस अशीच स्थिती राहिली
तर पाणीटंचाईला सामोरे जावे
लागू शकते.

धरणसाखळीत ३.३५ टीएमसी साठा
पुणेकर क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरतात, अशी टीका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी यापूर्वी केली आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीत नेहमीच अधिकचे पाणी साठवून ठेवले जाते. सध्या धरणसाखळीत ३.३५ टीएमसी एवढा साठा आहे. मात्र, गेल्या वर्षी ३० जून रोजी धरणात ४.१८ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणसाठा कमी असला तरी येत्या १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून केला जात आहे.

खडकवासला धरणसाखळीत १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे सध्यातरी धरणांमध्ये आवश्यक पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच पाणीकपात करण्याबाबत कोणतेही पत्र जलसंपदा विभागाने पालिकेला दिले नाही.
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता,
खडकवासला पाटबंधारे विभाग

पालिका प्रशासनातर्फे पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. तसेच सध्या खडकवासला धरणसाखळीत पुरेसा पाणीपुरवठा आहे. त्यामुळे पुणेकरांची पाणीकपात करण्याचा कोणताही विचार नाही.
- व्ही. जी. कुलकर्णी,
पाणीपुरवठा विभाग प्रमुख

Web Title: Water reservoir in the dam! The administration clarified that no rain falls in the catchment area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे